SBI Home Loan : प्रत्येकाचं स्वप्नातलं घर तयार करण्याचे स्वप्न असतं. मात्र घर बनवण्यासाठी अपेक्षित पैसा आपल्याकडे उपलब्ध नसतो. अशावेळी विचार येतो तो होम लोन चा. निश्चितच होम लोनमुळे स्वप्नातलं घर बांधण्यास मोठी मदत होत असते.
मात्र होम लोन संदर्भात माहितीचा अभाव अनेकांना असतो. अशा परिस्थितीत आज आपण स्टेट बँक ऑफ इंडिया कडून दिल्या जाणाऱ्या होम लोन संदर्भात सर्व माहिती थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
SBI होम लोन
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून घर बांधण्यासाठी तसेच घराच्या नूतनीकरणासाठी कर्ज हे उपलब्ध करून दिल जात. या बँकेकडून दिल्या जाणाऱ्या होम लोन ची एक विशेषता म्हणजे या बँकेकडून तब्बल 100 कोटी रुपयांपर्यंतचे होम लोन कर्जदाराला दिल जात. निश्चितच बँकेकडून दिल जाणार हे लोन क्रेडिट स्कोर अर्थातच सिबिल स्कोर, उत्पन्नाचे साधन, यांसारख्या बाबींवर अवलंबून राहणार आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी खुशखबर ! अहमदनगर महापालिकेमध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी निघाली भरती; आजच करा अर्ज
एसबीआय होम लोनच्या विशेषता
एसबीआय होम लोनच्या अनेक विशेषता आहेत. यामध्ये व्यक्तीला तीस वर्षांचा कर्ज परतफेड कालावधी उपलब्ध होतो. तसेच कमी व्याजदर आकारला जात, महिला कर्जदार व्यक्तीला व्याजदरात सवलत मिळते, या होम लोन साठी कोणतेच अप्रत्यक्ष शुल्क लागत नाहीत, प्रोसेसिंग शुल्क देखील कमी असते, या होम लोनसाठी प्री पेमेंट करण्यासाठी कोणतच अतिरिक्त शुल्क लागत नाही. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ देखील कर्जदार व्यक्तीला मिळू शकणार आहे.
एसबीआय होम लोनचे व्याजदर
एसबीआय बँकेकडून दिल्या जाणाऱ्या गृहकर्जावर सर्वसाधारणपणे 8.85 टक्के इतकं व्याजदर आकारल जात. मात्र या गृहकर्जावरील व्याजदर अनेक घटकांवर अवलंबून असतो जसे की अर्जदाराचे उत्पन्न, क्रेडिट स्कोअर, राहण्याचे ठिकाण, नोकरीची स्थिती इ. घटकांवर होम लोन वरील व्याजदर ठरत असतो.
एसबीआय होम लोन साठी आवश्यक पात्रता
एसबीआय अंतर्गत होम लोन मिळवण्यासाठी 18 ते 70 वयोगटातील सर्वच भारतीय नागरिक अर्ज करू शकणार आहेत.
सॅलरीड म्हणजे पगारदार व्यक्ती तसेच सेल्फ एम्प्लॉइड म्हणजेच व्यावसायिक व्यक्ति होम लोन साठी पात्र राहणार आहे.
हे पण वाचा :- MHADA News : बातमी कामाची ! म्हाडाची एकापेक्षा अधिक घरे घेता येतात का? जाणून घायच ना मग वाचा सविस्तर
एसबीआय कडून दिल्या जाणाऱ्या होम लोन चे प्रकार
नियमित गृहकर्ज
गृहकर्जाचे शिल्लक हस्तांतरण
NRI गृहकर्ज
फ्लेक्सिपे होम लोन
विशेषाधिकार गृह कर्ज
शौर्य गृह कर्ज
पूर्व-मंजूर गृहकर्ज
रियल्टी होम लोन
होम टॉप अप कर्ज
स्मार्ट होम टॉप अप कर्ज
YONO इन्स्टा होम टॉप-अप कर्ज
कॉर्पोरेट गृह कर्ज
पगार नसलेल्यांना गृहकर्ज
आदिवासी प्लस
अर्नेस्ट मनी डिपॉझिट (EMD)
रिव्हर्स मॉर्टगेज लोन
कमर्शियल रिअल इस्टेट होम लोन
मालमत्तेवर कर्ज (पी-एलएपी)
एसबीआय होम लोन साठी अर्ज कसा करायचा?
अनेकांचा एसबीआय होम लोन साठी अर्ज कसा करायचा हा प्रश्न असतो. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, यासाठी दोन पद्धतीने अर्ज सादर केले जातात. ऑनलाइन आणि ऑफलाइन कर्जासाठी अर्ज सादर केले जातात.
ऑनलाइन अर्ज कसा करायचा :- यासाठी सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या https://homeloans.sbi/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. वेबसाईटवर भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी our products या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर ज्या लोन साठी अप्लाय करायचे आहे तो लोन प्रकार सिलेक्ट करावा लागेल. यानंतर अप्लाय नाव या पर्यायावर क्लिक करावयाचे आहे. यानंतर आपल्या पुढ्यात एक अर्ज खुलेल. हा अर्ज काळजीपूर्वक भरावयाचा आहे. अर्ज भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. अर्ज भरून झाल्यानंतर काही दिवसात बँकेकडून आपल्याशी संपर्क साधला जाईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी बँकेच्या माध्यमातून होईल. जर कर्जासाठी तुमची पात्रता यथायोग्य असेल तर तुम्हाला लोन मंजूर होईल. मग मंजूर झालेलं कर्ज हे थेट तुमच्या बँक खात्यात बँकेच्या माध्यमातून ट्रान्सफर केल जाईल.
ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा :- यासाठी आपल्या एसबीआयच्या जवळील शाखेला भेट द्या. यानंतर त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याकडे होम लोन बाबत विचारपूस करा. अधिकारी आपल्याला याबाबत सविस्तर माहिती देतील. यानंतर अधिकारी तुमचे कागदपत्रे चेक करतील आणि तुम्हाला किती होम लोन मिळू शकतं या संदर्भात सांगतील. तुम्ही सादर केलेले सर्व कागदपत्रे आणि तुमची पात्रता होम लोन साठी यथायोग्य असेल तर तुम्हाला होम लोन बँकेच्या माध्यमातून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मंजूर होईल.
एसबीआय होम लोन साठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे
कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
नोकरी करत असल्यास एम्प्लॉयर ओळखपत्र
ऑफलाईन पद्धतीने जर अर्ज सादर करायचा असेल तर कर्ज अर्ज – पूर्णपणे भरलला कर्जाचा अर्ज
तसेच अर्जदाराला 3 पासपोर्ट आकाराचे फोटो द्यावे लागतील
ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान एक कागदपत्र सादर करावे लागेल.
रहिवासाचा तसेच पत्त्याचा पुरावा म्हणून टेलिफोन बिल, विजबिल, पाणी बिल, पाइप्ड गॅस बिल, पासपोर्ट/वाहन चालवण्याचा परवाना, आधार कार्ड यापैकी किमान एक कागदपत्र अर्जदाराला सादर करावे लागेल.
यासोबतच मालमत्तेची काही कागदपत्रे सादर करावी लागतील. यामध्ये आवश्यकता असल्यास बांधकामाची परवानगी संबंधित कागदपत्रे, भोगवट प्रमाणपत्र, विक्रीसाठी नोंदणीकृत करार यांसारखी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.
यासोबतच अर्जदार व्यक्तीला सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट लागेल.
तसेच आधीच इतर बँकेकडून कर्ज घेतलेले असल्यास एका वर्षाचे कर्ज खात्याचे स्टेटमेंट सादर करावे लागेल.
यासोबतच पगारदार अर्जदार, सहअर्जदार, गॅरंटर यांना उत्पन्नाचा पुरावा द्यावा लागेल. यामध्ये पगाराची स्लिप किंवा गेल्या 3 महिन्यांतील पगाराचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. तसेच गेल्या २ वर्षांतील फॉर्म 16 ची प्रत किंवा गेल्या 2 आर्थिक वर्षांतील प्राप्ती कर परताव्यांची प्राप्ती कर खात्याची अधिकृत प्रत जोडावी लागेल.
जे अर्जदार, सह अर्जदार, तसेच गॅरेंटर सेल्फ एम्प्लॉइड म्हणजेच व्यावसायिक असतील तर व्यवसाय पत्त्याचा पुरावा, गेल्या ३ वर्षांतील ताळेबंद आणि नफा व तोटा खाते, व्यवसाय परवान्याचे तपशील (किंवा तत्सम), टीडीएस प्रमाणपत्र (फॉर्म 16 ए, लागू होत असल्यास), पात्रता प्रमाणपत्र (सीए, डॉक्टर आणि इतर व्यावसायिकांसाठी) यांसारखी कागदपत्रे लागणार आहेत.
हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! सरकारी नोकर भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ झाली फिक्स; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार निर्णय