ई-केवायसी केली नाही तर पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता मिळणार का ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana : केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. ही योजना देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही योजना सुरू झाल्यानंतर अल्प कालावधीतच शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय बनली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील गरजवंत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत.

पण हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकरकमी मिळत नाहीत. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकूण तीन हप्त्यात दिले जातात. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यात वार्षिक सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारकडून जमा केले जातात.आतापर्यंत या योजनेअंतर्गत 14 हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मागील 14वा हप्ता हा 27 जुलै 2023 रोजी राजस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. आता 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन जवळपास दोन ते सव्वा दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे.यामुळे आता शेतकऱ्यांना पंधराव्या हफ्त्याचे वेध लागले आहे.

दर चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतो यामुळे आता पंधरावा आता केव्हा मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या योजनेचा पंधरावा हप्ता हा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात पात्र शेतकऱ्यांना मिळेल असे सांगितले जात आहे.

अशातच मात्र काही शेतकऱ्यांकडून जर केवायसी केलेली नसेल तर या योजनेचा पंधरावा हप्ता मिळेल का हा प्रश्न उपस्थित केला जात होता. यामुळे आज आपण या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता हा ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नव्हती त्यांना देण्यात आलेला नाही.

यामुळे या योजनेचा पंधरावा हप्ता मिळवण्यासाठी ई केवायसी करणे आवश्यक आहे. जे शेतकरी केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांना पंधरावा हप्ता मिळणार नाही. खरंतर मध्यंतरी या योजनेचा अनेक अपात्र शेतकऱ्यांनी लाभ उचलला असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत.

या बदलानुसार आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. अर्थातच या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 15 व्या हफ्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना केवायसीची प्रक्रिया करावी लागणार आहे. जे शेतकरी केवायसी पूर्ण करणार नाहीत त्यांना या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही.