Pm Kisan Yojana 14th Installment : केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक शेतकरी हिताची योजना 2019 पासून राबवली जात आहे. ही केंद्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना असून आता या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील एक योजना सुरू करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असे या महाराष्ट्र राज्य शासनाच्या नवीन योजनेचे नाव आहे. शिंदे-फडणवीस सरकारने नुकतीच सुरू केलेली ही एक शेतकरी हिताची योजना आहे. दरम्यान आता या दोन्ही योजनेबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसबाबत महत्वाची बातमी; ट्रेनच्या वेळेत होणार मोठा बदल, रेल्वे मंत्री म्हटले की…..
हाती आलेल्या माहितीनुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा येणारा चौदावा हप्ता हा लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. विशेष म्हणजे या हप्त्यासोबतच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता म्हणून दोन हजार रुपये देखील दिले जाणार आहेत. अर्थातच आता पीएम किसानच्या येणाऱ्या हफ्त्यासोबतच नमो शेतकरीचा पहिला हप्ता दिला जाणार आहे, म्हणजे पीएम किसानच्या पात्र शेतकऱ्यांना येणाऱ्या काही दिवसात चार हजाराचा लाभ मिळणार आहे.
हे पण वाचा :- नागपूरवासियांसाठी आनंदाची बातमी ! नागपूर ते ‘या’ शहरादरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस; असा राहणार रूट, पहा….
केव्हा येणार पीएम किसानचा हप्ता?
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसानचा 14 वा हप्ता देण्यासाठी केंद्र शासनाने राज्य शासनाकडून या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी मागवली आहे. अर्थातच हा हप्ता देण्यासाठी केंद्र शासनाकडून हालचाली वाढवण्यात आल्या आहेत.
या सदर मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर पीएम किसान चा चौदावा हप्ता हा मे महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. तसेच यावेळी नमो शेतकरीचा पहिला हप्ता देखील पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.
नमो शेतकरीसाठी कोण राहणार पात्र?
जे शेतकरी पीएम किसान साठी पात्र ठरणार आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी देखील पात्र राहणार आहेत. यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा चौदावा हप्ता मिळेल त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देऊ केला जाणार आहे.
कसं राहणार नमो शेतकरी योजनेचे स्वरूप
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान योजनेप्रमाणेच आहे. म्हणजेच या नव्याने सुरू करण्यात आलेल्या राज्याच्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहेत. हे सहा हजार रुपये एकूण तीन टप्प्यात दिले जाणार आहेत. दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीनेच या नवीन योजनेचे स्वरूप आहे.
दरम्यान आता मे महिन्यात या दोन्ही योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मे महिन्यातील कोणत्या तारखेला या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना दिला जाईल याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही. मात्र मे महिन्यात केव्हाही या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो असं सांगितलं जात आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; आता मुंबई ते कल्याण डोंबिवलीचा प्रवास होणार सुसाट, ‘हा’ मार्ग लवकरच होणार सुरु, पहा…..