Panjabrao Dakh Weather Update : भारतीय हवामान विभागाने राज्यात आगामी पाच दिवस अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचे सांगितले आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. पुणे वेधशाळेने देखील पुणे शहरात आणि जिल्ह्यात आगामी तीन दिवस पावसाची शक्यता असल्याचे नुकतेच सांगितले आहे.
यामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत आहेत. आधीच गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता या महिन्यात जवळपास 14 ते 15 दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ जवळपास सर्वत्र पावसाची हजेरी लागली आहे.
नासिक, पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, बीड या जिल्ह्यात गारपीट देखील झाली आहे. यामुळे काढणी योग्य कांदा, द्राक्ष आणि डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत नेमका पाऊस केव्हा थांबेल हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता उपस्थित होत आहे. याबाबत पंजाबराव यांनी नुकतीच एक मोठी माहिती दिली आहे.
हवामान तज्ञ पंजाबराव डखं यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात 18, 19 आणि 20 एप्रिल रोजी पावसाची शक्यता आहे. या कालावधीमध्ये पडणारा पाऊस मात्र राज्यात सर्वदूर पडणार नाही तर भाग बदलत पडणार आहे. एकंदरीत डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार आता 20 एप्रिल नंतर राज्यात हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे.
म्हणजेच 21 एप्रिल पासून राज्यात हवामान कोरडे राहील आणि निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. मात्र असे असले तरी मे महिन्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता असल्याचा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे. मे महिन्यात सहा मे च्या सुमारास राज्यात पावसाची शक्यता आहे. याशिवाय 15 मे नंतर म्हणजेच 16 मे च्या आसपास राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल असे देखील मत त्यांनी व्यक्त केल आहे.
म्हणजे पुढील मे महिन्यात दोनदा अवकाळी पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुढच्या महिन्यात पडणारा पाऊस मात्र कोणत्या जिल्ह्यात पडेल, कशा स्वरूपाचा पडेल याबाबत अद्याप डख यांनी माहिती दिलेली नाही. परंतु एक मे च्या सुमारास डख याबाबत योग्य ती माहिती देतील अस सांगितलं जात आहे.
हे पण वाचा :- आता मध्य महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट ! राजधानी मुंबईशी वाढणार कनेक्ट, पहा….