Onion Price : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कांदा दरात आता सुधारणा होऊ लागली आहे. खरंतर खरीप हंगामातील लाल कांदा शेतकऱ्यांनी अतिशय कवडीमोल दरात विकला आहे. मात्र पाच ते सहा रुपये किलो याप्रमाणे लाल कांद्याची विक्री झाली असून काही बाजारात तर याहीपेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः वाहन खर्च आणि उत्पादनासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आला नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा बाजारात विक्रीसाठी येऊ लागला आहे.
मात्र खरिपातील लाल कांद्याप्रमाणेच उन्हाळी कांदा देखील अगदी कमी दरात शेतकऱ्यांना विकावा लागत होता. कमी गुणवत्ता असलेला कांदा 600 ते 700 रुपये प्रति क्विंटल आणि चांगला गुणवत्ता असलेला कांदा 800 ते 1200 रुपये प्रति क्विंटल या दरात एप्रिल महिन्यात उन्हाळी कांद्याची विक्री झाली आहे.
विशेष बाब म्हणजे मार्च आणि एप्रिल तसेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि काही भागात झालेल्या गारपिटीमुळे उन्हाळी हंगामातील कांदा पिक मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाले होते.
हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा ! सफरचंद लागवडीचा प्रयोग ठरला यशस्वी, कोणत्या जातीची केली लागवड? पहा….
उन्हाळी हंगामातील कांदा उत्पादनात यामुळे घट आली होती. शिवाय पाण्यात सापडलेला उन्हाळी कांदा अधिक काळ टिकणार नसल्याचे शेतकरी नमूद करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी कांदा देखील लवकरात लवकर विकावा लागत आहे. दरम्यान आता उन्हाळी कांदा दरात वाढ नमूद केली जात आहे.
खरंतर बांगलादेशने नुकतेच आयातीवरील निर्बंध उठवले आहेत. शिवाय आता बाजारात कांद्याची आवक कमी होत असल्याने दरात वाढ होत असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मार्च 2023 मध्ये बांगलादेश सरकारने तेथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा म्हणून आयात बंद केली होती.
मात्र आता तेथे कांद्याची आवक कमी झाली असून दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे आयातीवरील निर्बंध तेथील सरकारने उठवले आहेत. परिणामी आता महाराष्ट्रातून तसेच संपूर्ण भारतातून बांगलादेशला मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होणार आहे.
हे पण वाचा :- पांढरं सोन हंगामाचा शेवट करणार गोड ! कापसाच्या दरात झाली तब्बल सातशे रुपयांची वाढ, ‘या’ बाजारात झाली दरवाढ
या पार्श्वभूमीवर आता देशांतर्गत कांदा दरात वाढ होत आहे. राज्यातील प्रमुख बाजारात कांद्याच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांची सुधारणा झाली आहे. काल अर्थातच 5 मे 2023 रोजी झालेल्या लिलावात राज्यात उन्हाळी कांद्याला 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे.
पिंपळगाव एपीएमसी मध्ये हा भाव मिळाला आहे. काल पिंपळगाव मध्ये 34 हजार 375 क्विंटल आवक झाली असून किमान 200, कमाल 2200 आणि सरासरी 1100 रुपयांचा भाव नमूद करण्यात आला. राज्यातील इतर प्रमुख बाजारात मात्र सरासरी भाव ७०० ते १०५० रुपये प्रति क्विंटल एवढाच होता.
मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत दरात 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे आगामी काही दिवसांत दरात आणखी वाढ होण्याची शक्यता देखील आहे. निश्चितच कांदा उत्पादकांसाठी ही एक दिलासा देणारी बाब राहणार आहे.
हे पण वाचा :- पीएम किसान योजना : ‘हे’ 18% शेतकरी राहणार योजनेपासून वंचित, पहा….