Apple Farming In Maharashtra : अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा. जिल्ह्याचे क्षेत्रफळ जेवढे मोठे आहे तेवढीच या जिल्ह्याची ख्यातीही आहे. हा जिल्हा सहकार आणि कृषी क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करत आपलं वेगळंपण कायमच सिद्ध करून दाखवले आहे.
येथील शेतकऱ्यांनी असे काही प्रयोग केले आहेत ज्याची भुरळ सबंध महाराष्ट्राला पडली आहे. येथील शेतकऱ्यांच्या प्रयोगाची चर्चा कायमच पाहायला मिळते. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील जवळा येथील एका प्रयोगशील शेतकरी दांपत्याने चक्क सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.
खरंतर सफरचंद हे थंड हवामानात आढळणारे आणि वाढणारे पीक आहे. या पिकाची लागवड आपल्या भारतात जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यात सर्वाधिक केली जाते. या दोन राज्यांची सफरचंद शेतीमध्ये मक्तेदारी आहे. मात्र आता ही मक्तेदारी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न इतर शेतकऱ्यांनी सुरू केला आहे.
हे पण वाचा :- पीएम किसान योजना : ‘हे’ 18% शेतकरी राहणार योजनेपासून वंचित, पहा….
सफरचंदला बाजारात असलेली मागणी आणि त्याला मिळत असलेला दर यामुळे आता देशातील इतरही राज्यातील शेतकऱ्यांनी सफरचंद लागवडीचा प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातही अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी सफरचंद शेती यशस्वी करून दाखवली आहे.
यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जवळा येथील अनिल गबाजी आढाव या उच्चशिक्षित शेतकऱ्याने त्यांच्या धर्मपत्नी लता आढाव यांच्या समवेत सफरचंद शेती यशस्वी केली आहे. विशेष म्हणजे आता त्यांनी लागवड केलेल्या सफरचंद पिकाला चांगली फळधारणा देखील झाली आहे. अनिल आढाव यांनी बीएससी पर्यंतचे शिक्षण घेतल आहे.
शिक्षणानंतर त्यांनी काही काळ बँकेत नोकरी देखील केली. ते नोकरीवर असताना घरच्या शेतीची जबाबदारी त्यांनी पत्नी लता यांच्यावर सोपवली होती. मात्र घरची जबाबदारी आणि शेती सांभाळताना लता आढाव यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शिवाय अनिल यांना लहानपणापासूनच शेतीची आवड असल्याने नोकरीमध्ये त्यांचे मन रमत नव्हते.
हे पण वाचा :- Tur Farming : यंदाही तुरीला मिळणार 10 हजाराचा दर ! पण तूर लागवड करतांना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; नाहीतर….
परिणामी त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. मग अनिल यांनी त्यांची पत्नी लता यांच्या समवेत शेतीमध्ये विविध प्रयोग राबवलेत. पेरू, सिताफळ, आंबा सोबतच सफरचंद या फळ पिकांची शेती सुरू केली. आढाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी सफरचंदाची लागवड केली. हरमन 99 या जातीच्या रोपांची आपल्या 16 गुंठे जमिनीत लागवड केली. रोपे हिमाचल प्रदेश मधील एका प्रतिष्ठित नर्सरी मधून मागवली.
सोळा गुंठ्यात जवळपास 175 सफरचंदाची रोपे लावलीत. रोपांची लागवड केल्यानंतर योग्य नियोजन केले आणि आता तीन वर्षांनी या सफरचंदाच्या झाडांना चांगली फळधारणा झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी उत्पादित केलेल्या या सफरचंदाला 100 रुपये प्रति किलो पर्यंतचा भाव मिळेल अशी त्यांना आशा आहे.
निश्चितच अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये आढळणारे सफरचंद नगर सारख्या उष्ण हवामानात उत्पादित करून इतरांसाठी मार्गदर्शक असे काम केल आहे यात तीळमात्र देखील शंका नाही. या प्रयोगशील शेतकरी दांपत्याच्या या प्रयोगाची भुरळ आता सबंध महाराष्ट्राला पडली आहे.
हे पण वाचा :- सोयाबीन वाण निवडताना ‘ही’ काळजी घ्या; उत्पादनातं विक्रमी वाढ होणार, वाचा….