Onion Nafed Procurement : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे उन्हाळ हंगामातील कांदा खरेदी नाफेड कडून एक जून 2023 रोजी सुरू केली जाणार आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार एक जून 2023 अर्थातच उद्यापासून नाफेडची उन्हाळा हंगामातील कांदा खरेदी सुरू होणार आहे. निश्चितच नाफेडच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
हाती माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे येथे कांदा खरेदी केंद्रावर उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या माध्यमातून या कांदा खरेदीचे उद्घाटन होणार आहे.
महाराष्ट्रात किती कांदा खरेदी होणार?
उद्यापासून नाफेड कडून उन्हाळा हंगामातील कांदा खरेदी सुरू होणार आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यात नाफेड कडून कांदा खरेदी सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुणे, छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव, अहमदनगर या जिल्ह्यातही कांदा खरेदी सुरु होणार आहे. राज्यात नाफेडकडून जवळपास तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘त्या’ 2 लाख शेतकऱ्यांना मिळणार गुड न्युज ! शिंदे सरकार 740 कोटी रुपये करणार वितरित ?, पहा….
भाववाढ होणार का?
वास्तविक गेल्या काही महिन्यांपासून कांदा अतिशय कवडीमोल दरात विकला जात आहे. खरीप हंगामातील लाल कांदा तर स्वस्तात विकलाच आहे आता उन्हाळ कांदा देखील स्वस्त दरात शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा भ्रूदंड सहन करावा लागत आहे.
म्हणून कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांनी नाफेडकडून कांदा खरेदी केली पाहिजे अशी मागणी केली होती. नाशिक जिल्ह्यात यासाठी शेतकऱ्यांकडून केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली होती तसेच इतर लोकप्रतिनिधींकडे देखील यासाठी निवेदन देण्यात आली होती.
दरम्यान केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी केंद्राकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता. आता मंत्री भारती पवार यांचा पाठपुरावा यशस्वी झाला असून नाफेडकडून उद्या अर्थातच एक जून 2023 पासून कांदा खरेदीला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान नाफेडकडून कांदा खरेदी सुरू झाली असल्याने शेतकऱ्यांचा कांदा योग्य भावात विकला जाईल अशी आशा आहे. तसेच नाफेड कांदा खरेदीसाठी उतरणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये चुरस निर्माण होईल आणि बाजारातील इतर व्यापारी देखील कांद्याला चांगला भाव देतील असा आशावाद व्यक्त होत आहे.