पीएम कुसुम योजना : 90% अनुदानावर सौर कृषीपंप, दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु, अर्ज भरतांना अडचण आल्यास ‘या’ नंबरवर संपर्क करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kusum Yojana : पंतप्रधान कुसुम योजना ही केंद्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. 90 ते 95 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळत आहेत.

अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर आणि सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. निश्चितच केंद्र शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरणारी आहे.

हेच कारण आहे की या योजनेला शेतकऱ्यांनी देखील चांगली पसंती दाखवली आहे. या योजनेअंतर्गत आता दुसऱ्या टप्प्यातील अर्जासाठी 17 मे 2023 पासून सुरुवात झाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत 23 हजार 600 हुन अधिक लोकांनी यासाठी अर्ज सादर केले आहेत. परंतु एकाच वेळी अनेक शेतकरी या योजनेसाठी अर्ज करत असल्याने संकेतस्थळ बंद पडण्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत.

दरम्यान, संकेतस्थळाचा आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्याचे काम महाऊर्जा करत असल्याचे महाऊर्जाकडून सांगितले जात असून कोटा उपलब्ध झाल्यावरच अर्ज करावा असे आवाहन शेतकऱ्यांना केले जात आहे.

हे पण वाचा :- केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ; लाखो शेतकऱ्यांना दिलासा | Crop Insurance Scheme

शेतकऱ्यांना किती HP चा सौर कृषी पंप मिळणार ?

या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांकडे अडीच एकर जमीन आहे अशा शेतकऱ्यांना तीन एचपी चा सौर कृषी पंप मिळतो. यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10% आणि अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.

तसेच अडीच एकर ते पाच एकर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना पाच एचपीचा सौर कृषी पंप मिळतो. यासाठी देखील सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना दहा टक्के आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘त्या’ 2 लाख शेतकऱ्यांना मिळणार गुड न्युज ! शिंदे सरकार 740 कोटी रुपये करणार वितरित ?, पहा….

तसेच पाच एकर पेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांना साडेसात एचपी चा सौर कृषी पंप या योजनेच्या माध्यमातून मिळतो. यासाठी देखील 90 ते 95 टक्के अनुदान मिळते. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10% आणि एसी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच टक्के लाभार्थी हिस्सा यासाठी भरावा लागतो.

अर्ज भरताना अडचण आल्यास या नंबरवर करा फोन

या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 17 मे 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, एकाच वेळी अनेक शेतकरी या योजनेसाठी अर्ज करत असल्याने संकेतस्थळ बंद पडत आहे. म्हणून शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मात्र जर शेतकऱ्यांना अर्ज भरताना काही अडचणींचा सामना करावा लागत असेल तर ते ०२०-३५०००४५६ किंवा ०२०-३५०००४५७ या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या अडचणी दूर करू शकणार आहेत. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, सावकाराने जमीन अवैधरित्या कब्जा केली तर ‘या’ अधिकाऱ्याकडे करा अर्ज, जमीन परत मिळणार ! ही कागदपत्र लागणार, वाचा संपूर्ण प्रक्रिया

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा