Okra Farming : भारतात गेल्या अनेक दशकांपासून भाजीपाला पिकांची लागवड (Vegetable Farming) मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आपल्या राज्यातही शेतकरी बांधव (Farmer) भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) शेती मोठ्या प्रमाणात करतात.
भेंडी (Okra Crop) हेदेखील एक प्रमुख भाजीपाला पिक आहे. या पिकाची आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. मित्रांनो आता भेंडीची एक नवीन जात विकसित करण्यात आली आहे जिला बाजारात तब्बल पाचशे रुपये प्रति किलोचा दर मिळतो.
मित्रांनो या संशोधकांनी लाल भेंडीची (Red Okra Crop) नवीन सुधारित जात विकसित केली आहे. या जातीचा कलर लाल असल्याने या जातीची भेंडी दिसायला आकर्षक तसेच त्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म मानवी आरोग्यासाठी खूपच फायद्याचे ठरतात. यामुळे या भेंडीला बाजारात मागणी देखील चांगली आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, कर्नालच्या MHU ने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल इन्स्टिट्यूट वाराणसीच्या सहकार्याने भेंडी आणि चवळीच्या मिश्रणासह लाल भेंडीची संकरित जाती विकसित केली आहे.
ही भेंडी खाण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही उपयुक्त आहे. या संस्थेने विकसित केलेल्या या लाल भेंडीला काशी लालिमा असं नाव दिलं आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया काशी लालिमा या जातीच्या भेंडी (Red Okra Farming) विषयी.
अनेक राज्यांमध्ये लाल भेंडीची लागवड
मित्रांनो मीडिया रिपोर्ट नुसार आपल्या भारतात अलीकडे लाल भेंडीची मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये या जातीच्या लाल भेंडीची लागवड सुरू झाली आहे. त्याची पेरणी देखील हिरव्या भेंडी प्रमाणेचं केली जाते.
यासाठी चांगला निचरा होणारी वालुकामय चिकणमाती असलेली जमीन उत्तम आहे. ज्या शेतजमिनीचे pH मूल्य 6.5 – 7.5 आहे अशा जमिनीत लाल भेंडीची लागवड केली जाऊ शकते. ज्या शेतात सूर्यप्रकाश योग्य प्रकारे पोहचतो अशा ठिकाणी भेंडीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.
सामान्य भेंडी पेक्षा महाग विकले जाते
जाणकार लोकांनी दिलेला बहुमूल्य माहितीनुसार, लाल भेंडीची लागवड करण्यासाठी फारसा खर्च येत नाही. एक एकर क्षेत्रात लाल भेंडीची लागवड केल्यास सुमारे 20 क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकते. बाजारात हिरव्या रंगाच्या भेंडीपेक्षा जास्त दराने लाल भेंडी विकली जाते.
बाजारात लाल भेंडी सुमारे 500 रुपये किलोने विकले जाते. त्यानुसार 1 एकरमध्ये लाल भेंडीची लागवड करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. लाल भेंडी लागवड करून शेतकरी बांधव एकरी दहा लाखांपर्यंत कमाई करू शकतात.