New Metro Railway Station : भारतीय रेल्वेला स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास आहे. ब्रिटिशांनी सुरू केलेली ही रेल्वे आता स्वातंत्र्यानंतर हायटेक झाली आहे. स्वातंत्र्यापूर्वी कोळशावर रेल्वे चालत असे मात्र आता तंत्रज्ञानाने चांगली प्रगती केली आहे. त्यामुळे आता विजेवर चालणारी रेल्वे धावत आहे.
विशेष म्हणजे रेल्वेचा वेग देखील दिवसेंदिवस वाढू लागला आहे. देशात आता वंदे भारत एक्सप्रेस सारख्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या हायस्पीड ट्रेन सुरू झाल्या आहेत. या गाडीचा कमाल वेग तब्बल 180 किलोमीटर प्रति तास एवढा आहे.
विशेष म्हणजे आता यापुढे जात भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशात लवकरच बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे. सध्या देशात बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर असून आगामी काही वर्षांमध्ये देशाला पहिल्या बुलेट ट्रेनची भेट मिळणार आहे.
देशात धावणारी ही बुलेट ट्रेन कमाल 350 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यासं सक्षम राहील असा दावा देखील केला जात आहे. शिवाय देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये मेट्रोचे देखील जाळे विकसित केले जात आहे. महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यातील पुणे, नागपूर आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये मेट्रो सुरु झाली आहे.
खरे तर जेव्हा जेव्हा मुंबईचा विचार येतो तेव्हा सर्वप्रथम आपल्या डोळ्यापुढे खरंतर लोकलचे दृश्य उभे राहत. लोकलमुळे राजधानी मुंबईला एक नवीन ओळख मिळाली आहे. लोकल ही मुंबईची लाईफ लाईन आहे. मात्र हे जरी वास्तव असलं तरी देखील लोकलमध्ये होणारे प्रवाशांचे हाल हे कोणापासून लपून राहिलेले नाहीत.
हेच कारण आहे की मुंबईमधील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित अन गतिमान व्हावा या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मार्गांवर मेट्रो सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे. या अनुषंगाने आतापर्यंत शहरातील दोन महत्त्वाच्या मार्गांवर मेट्रो सुरु झाली आहे.
विशेष म्हणजे शहराला लवकरच आणखी एका मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे. मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान या मेट्रोमार्ग अंतर्गत जगातील सर्वाधिक लांबीचे मेट्रो स्टेशन विकसित होणार आहे.
हा मेट्रो मार्ग 3 सिप्झ ते कफ परेड दरम्यान विकसित होणार असून या मार्गातील सिप्झ ते बीकेसी, वांद्रे लवकर सुरू होईल अशी आशा आहे. या पहिल्या टप्प्यातील बीकेसी हे स्टेशन देशातील सर्वाधिक लांबीचे मेट्रो स्टेशन आणि जगातील मोजक्या सर्वाधिक लांबीच्या स्टेशन पैकी एक राहणार आहे.
या स्टेशनची विशेषता म्हणजे हे एखाद्या जंक्शन रेल्वे स्थानकाप्रमाणे काम करणार आहे. येथे अनेक गाड्या येऊन त्या टर्मिनेट होऊन मागे जाणार आहेत. या स्टेशनची लांबी ही जवळपास अर्धा किलोमीटर एवढी असेल. 475 मीटर लांबीचे हे मेट्रो स्टेशन मुंबईच्या वैभवात भर घालण्याचे काम करेल एवढे नक्की.
खरे तर मेट्रो स्टेशन हे साधारणपणे 200 ते 250 मीटर लांबीचे असतात. मात्र बीकेसी मेट्रो स्टेशनची लांबी ही इतर सर्वसाधारण मेट्रो स्टेशन पेक्षा दुप्पट राहणार आहे. सध्या बीकेसी मेट्रो स्टेशनचे काम युद्धपातळीवर सुरू असून आगामी काही महिन्यात या स्टेशनचे काम पूर्ण होईल आणि तदनंतर हा पहिला टप्पा सुरू होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.