Nashik News : नासिक-पुणे रेल्वे मार्गासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी मोठा वाद सुरू आहे. वाईन सिटी नासिक आणि शिक्षणाचे माहेरघर पुणे यांना जोडणारा हा रेल्वे मार्ग या दोन्ही शहरांच्या एकात्मिक विकासासाठी अति आवश्यक आहे. यामुळे नासिक आणि पुणे दरम्यान रोजाना प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या सात वर्षांपूर्वी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
यासाठी महारेलने चार वर्षे डीपीआर म्हणजेच तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार केला आहे. अशातच काल या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून नवीन सुधारित डीपीआर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे हा रेल्वेमार्ग होतो की नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
विशेष बाब म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी महारेलने निधी अभावी या मार्गाचे काम थांबवण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्याला विनंती केली होती. यासाठी पत्रव्यवहार देखील झाला. दरम्यान आता याबाबतच एक मोठी माहिती हाती येत आहे. महारेलने यासंदर्भात असा दावा केला आहे की निधी अभावी रेल्वे मार्गाची भूसंपादनाची स्थगिती ही नजरचुकीने देण्यात आली आहे. तसेच मार्गासाठी भूसंपादन योग्यरीत्या सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे पण वाचा :- SBI मधून होमलोन घेण्याचा विचार करताय का? मग एसबीआय गृहकर्ज संदर्भात ए टू झेड माहिती वाचा एका क्लिकवर
या ठिकाणी विशेष असं की, पंधरा दिवसांपूर्वी महा रेलने जे पत्र पाठवलं त्यामध्ये निधी अभावी भूसंपादन थांबवण्यासाठी विनंती झाली होती. मात्र या रेल्वे मार्गासाठी आता निधी उपलब्ध आहे की नाही? जिल्हाधिकारी कार्यालयाने आता रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करावे की नाही? याबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. खरं पाहता या रेल्वे मार्गासाठी नासिक आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती.
या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला आणि अखेर केंद्र सरकारने तसेच रेल्वे बोर्डाने या प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिली. यामुळे रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली. राज्य सरकारला देखील या रेल्वे मार्गाच्या कामासाठी निधी देण्यास सांगितले. याला राज्य शासनाने 2020 मध्ये तत्वतः मान्यता दिली. परंतु अजूनही या रेल्वे मार्ग प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.
मात्र असे जरी असले तरी देखील नाशिक जिल्ह्यात या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात या प्रकल्पासाठी 45 हेक्टर जमीन संपादित झाली असून जमीन मालकांना 56 कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी खुशखबर ! अहमदनगर महापालिकेमध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी निघाली भरती; आजच करा अर्ज
जिल्ह्यातील एकूण 22 गावात भूसंपादन करण्यात येणार असून 242 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. हा प्रकल्प जिल्ह्यातील सिन्नर आणि नासिक या दोन तालुक्यात प्रस्तावित आहे. विशेष बाब म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी या रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी नाशिक जिल्ह्यात शर्तीचे प्रयत्न सुरू होते. मात्र अचानक महारेल ने भूसंपादन थांबवण्याच पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवल्यानंतर या प्रकल्पावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
विशेष म्हणजे कालच या रेल्वे मार्ग प्रकल्पासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून एक मोठी अपडेट हाती आली आहे. रेल्वे मंत्रालयाने या रेल्वे मार्गासाठी नवीन सुधारित डी पी आर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा रेल्वे मार्ग प्रकल्प होणार की गुंडाळला जाणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान आता महारेल ने आपल्या पंधरा दिवसांपूर्वी पाठवलेल्या पत्रावर सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे.
महारेलने एक मार्च रोजी नवीन पत्र पाठवून पंधरा दिवसांपूर्वी पाठवलेले पत्र अनावधानाने पाठवलं असल्याचा दावा केला आहे. निश्चितच यामुळे कुठे ना कुठे पुन्हा एकदा या प्रकल्पाचे काम मार्गी लागेल अशी आशा व्यक्त होत आहे. मात्र अद्याप निधीचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी निधी उपलब्ध आहे का याबाबत सविस्तर अशी माहिती समोर येणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :- MHADA News : बातमी कामाची ! म्हाडाची एकापेक्षा अधिक घरे घेता येतात का? जाणून घायच ना मग वाचा सविस्तर