Mumbai St Bus News : मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. वास्तविक मुंबईकरांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून नवनवीन मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र असे असले तरी अद्याप काही मार्गावर बस सेवा एसटीकडून सुरू झालेल्या नाहीत. यामुळे मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. देवाची आळंदी या महाराष्ट्रातील एका प्रमुख तीर्थक्षेत्रासाठी देखील मुंबईहून थेट बस सेवा उपलब्ध नव्हती.
महाराष्ट्रातून नव्हे-नवे तर संपूर्ण भारत वर्षातून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी रोजाना हजारो भाविक देवाची आळंदी येथे गर्दी करत असतात. मुंबई मधून देखील मोठ्या प्रमाणात देवाची आनंदी येथे दर्शनासाठी भाविक जात असतात. यामुळे मुंबई ते देवाची आळंदी अशी थेट बस सेवा सुरू व्हावी अशी मागणी मुंबईकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची होती. दरम्यान आता ही प्रवाशांची मागणी मान्य झाली असून 21 एप्रिल 2023 पासून मुंबई ते देवाची आळंदी अशी नवीन बस सेवा सुरू झाली आहे.
हे पण वाचा :- मुंबईची चांदी होणार ! आता ‘हा’ बहुचर्चित मेट्रो मार्ग ‘या’ महिन्यात होणार सुरू, संपूर्ण रूटची माहिती वाचा इथं
कस आहे या बसचं वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार सेंट्रल मुंबई येथून सकाळी सात वाजता ही बस आळंदीच्या दिशेने रवाना होईल आणि दुपारी दीड वाजता ही बस आळंदी येथे पोहोचेल. या बसच्या परतीच्या प्रवासाबाबत म्हणजेच आळंदी ते मुंबईच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर दुपारी एक वाजून 45 मिनिटांनी ही बस मुंबईकडे रवाना होणार आहे.
बसचा मार्ग कसा असेल बरं?
भायखळा (प.) – काळाचौकी – दादर – कुर्ला – घाटकोपर (प.) – मानखुर्द – शिवाजीनगर
(गोवंडी) – सानपाडा – नेहरूळ (एल.पी.) – कामोठे – कळंबोली – पनवेल – खोपोली – कार्ला फाटा – तळेगांव डेपो – भंडारा डोंगर – देहू फाटा, श्री क्षेत्र देहू – मोशी – आळंदी देवाची असा या बसचा मार्ग राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हे पण वाचा :- कांदा अनुदानाचा पैसा ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा? तारीख आली समोर; कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली माहिती
निश्चितच, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी मुंबईहून जाणाऱ्या भाविकांना या निमित्ताने एक मोठी भेट महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या बसमुळे आता मुंबई ते आळंदीचा प्रवास सोयीचा होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
विशेष बाब अशी की महाराष्ट्र राज्य शासनाने महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सवलत सुरु केली आहे. यामुळे मुंबई ते देवाची आळंदी दरम्यान सुरू झालेल्या या बस सेवेला मोठा प्रतिसाद महिलाकडून मिळणार असल्याचे जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे.
हे पण वाचा :- ‘या’ 75 मार्गांवर सुरु होणार वंदे भारत ट्रेन; पुणे, मुंबईला किती Vande Bharat Express मिळणार? पहा संपूर्ण यादी