मुंबईची चांदी होणार ! आता ‘हा’ बहुचर्चित मेट्रो मार्ग ‘या’ महिन्यात होणार सुरू, संपूर्ण रूटची माहिती वाचा इथं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Metro Railway News : सध्या मुंबईमध्ये लोहमार्गाची कामे जलद गतीने सुरू आहेत. लोकलचा विस्तार होत आहे, वंदे भारत एक्सप्रेसची कनेक्टिव्हिटी लागत आहे. याशिवाय विविध मार्गावर मेट्रो देखील सुरू केल्या जात आहेत.

दरम्यान, आता नवी मुंबईकरांना लवकरच मेट्रोचा लाभ मिळणार आहे. बेलापूर ते पेंधर या मार्गावर आता मेट्रो सुरु होणार असल्याचे चित्र आहे. यासाठी सिडकोच्या माध्यमातून प्रयत्न जोरात सुरू आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा मेट्रो मार्ग प्रकल्प सिडको ने बारा वर्षांपूर्वी हाती घेतला होता.

हे पण वाचा :- ‘या’ 75 मार्गांवर सुरु होणार वंदे भारत ट्रेन; पुणे, मुंबईला किती Vande Bharat Express मिळणार? पहा संपूर्ण यादी

परंतु हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रकल्पाच्या कामात वेगवेगळी अडथळे आलेत यामुळे या प्रकल्पाचे काम वेळेत होत नव्हते. म्हणून सिडकोने हा प्रकल्प महामेट्रोकडे सुपूर्द केला. महा मेट्रोकडे प्रकल्प आल्यानंतर या प्रकल्पाला खरी गती मिळाली.

आता हा मेट्रो मार्ग प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. सिडकोने महा मेट्रोला हा प्रकल्प एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे.

विशेष म्हणजे पेंधर ते तळोजा या मार्गावर मेट्रोची चाचणी देखील पार पडणार आहे. ही शेवटची चाचणी असून ही चाचणी यशस्वीरित्या पार पडल्यानंतर या मेट्रोमार्ग प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.

हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस; ‘या’ रूटवर धावणार देशातील 16वी Vande Bharat Train; मे महिन्यात होणार उदघाट्न, पहा…..

केव्हा सुरु होणार मेट्रो

बेलापूर ते पेंधर हा मेट्रो मार्ग प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला असून एप्रिल महिन्यात या प्रकल्पाचे संपूर्ण काम होण्याची आशा आहे. या मार्गांवरील रेल्वे ट्रॅक, वीजवाहिन्या, सीसी टीव्ही नियंत्रण कक्ष, रेल्वेस्थानकावरील सरकत्या जिन्यांची म्हणजे एस्कीलेटरची कामे पूर्ण झाली आहेत.

तसेच प्रत्येक स्थानकावर वाहनतळाची देखील कामे पूर्ण झाली आहेत. म्हणजेच या मार्गाचे बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. जी काही किरकोळ कामे राहिली आहेत ती देखील अंतिम टप्प्यात आली आहेत.

म्हणजे आता या चालू महिन्याअखेर या मार्गाचे काम पूर्ण होणार असून पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात याला हिरवा झेंडा दाखवला जाण्याची दाट शक्यता जाणकार लोकांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत नवी मुंबईकरांना पुढील महिन्यापासून या मेट्रोचा लाभ घेता येणार आहे.

हे पण वाचा :- मुंबईची चांदी होणार ! आणखी 3 वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार; रूटची माहिती वाचा इथं

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा