Mumbai Solapur Vande Bharat Train Timing Change : मुंबई-पुणे-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस खूपच कमी वेळेत प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. यामुळे पुणे आणि सोलापूर वासियांचा मुंबईकडील प्रवास सोयीचा झाला आहे. वंदे भारत ट्रेन ही विशेषतः गतीमान, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाते. या ट्रेनचे भाडे निश्चितच इतर एक्सप्रेसच्या तुलनेत अधिक आहे मात्र वेगवान आणि सुरक्षित, आरामदायी प्रवास यामुळे रेल्वे प्रवाशांकडून या ट्रेनला विशेष प्रेम दिले जात आहे.
दरम्यान आता मुंबई-सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठी माहिती समोर येत आहे. ही ट्रेन निश्चितच पुणे आणि सोलापूर वासियांसाठी फायदेशीर ठरत आहे मात्र या ट्रेनची वेळ प्रवाशांसाठी अनुकूल नसल्याचे मत व्यक्त होत आहे. यामुळे या गाडीच्या टाइमिंग मध्ये बदल करण्याची मागणी अगदी सुरुवातीपासून केली जात आहे.
हे पण वाचा :- नागपूरवासियांसाठी आनंदाची बातमी ! नागपूर ते ‘या’ शहरादरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस; असा राहणार रूट, पहा….
प्रवाशांकडून देखील या गाडीच्या वेळेमध्ये बदल व्हावा अशी मागणी केली जात आहे. अशातच सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांनी यासंदर्भात जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. यासाठी त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे. खासदार महोदय यांनी ही ट्रेन मुंबईहून सायंकाळी सहा वाजता सोडण्याची मागणी केली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या ही ट्रेन मुंबईहून दुपारी चार वाजेच्या सुमारास निघते. यामुळे कामानिमित्त मुंबईमध्ये गेलेल्या प्रवाशांना परतीच्या प्रवासात या ट्रेनचा फायदा होत नाही. म्हणून या ट्रेनच्या वेळेत बदल करून सायंकाळी सहाला ही ट्रेन सोडली पाहिजे अशी मागणी खासदार महोदय यांनी केली आहे.
विशेष म्हणजे या मागणीवर रेल्वेमंत्री सकारात्मक आहेत. परंतु सायंकाळी सहा ऐवजी सात वाजता ही ट्रेन मुंबईहून सोडली जाईल अशी शक्यता आहे. याबाबत एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात निर्णय घेतला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे. सोलापूरच्या खासदारांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, त्यांनी मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस च्या वेळेत बदल करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली होती.
या भेटीदरम्यान रेल्वेमंत्र्यांनी वेळेत बदल करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या सहव्यवस्थापकांसोबत देखील खासदार महोदय यांनी चर्चा केली आहे आणि रेल्वे प्रशासन देखील याबाबत सकारात्मक आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; आता मुंबई ते कल्याण डोंबिवलीचा प्रवास होणार सुसाट, ‘हा’ मार्ग लवकरच होणार सुरु, पहा…..