Mumbai Solapur Vande Bharat Train New Halt : मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस 10 फेब्रुवारी 2023 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. सेवेत दाखल झाल्यानंतर मात्र एक महिन्याच्या कार्यकाळात या वंदे भारत ट्रेन ने हजारो प्रवाशांनी प्रवास केला आहे. अल्पावधीतच ही ट्रेन प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे.
वास्तविक मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे मार्गे धावत आहे. त्यामुळे या ट्रेनचा आयटी हब आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी तसेच शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ख्यातीप्राप्त असलेल्या पुण्याला देखील मोठा फायदा होत आहे. यामुळे मुंबई आणि पुणे हे दोन कॅपिटल शहर परस्परांना आणखी जवळ झाले आहेत.
हे पण वाचा :- मुंबईची चांदी होणार ! आता ‘हा’ बहुचर्चित मेट्रो मार्ग ‘या’ महिन्यात होणार सुरू, संपूर्ण रूटची माहिती वाचा इथं
या गाडीमुळे मुंबई, पुणे आणि सोलापूर या तीन शहरा दरम्यानचा प्रवास अधिक सोयीचा झाला आहे. दरम्यान प्रवाशांनी या गाडी संदर्भात आपल्या काही मागण्या देखील गेल्या काही दिवसांत उपस्थित केल्या आहेत. ही गाडी सुरू झाली तेव्हापासून प्रवाशांच्या माध्यमातून या गाडीला दौंड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी जोर धरत आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पाठपुरावा केला आहे.
ट्विटरवर देखील सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात एक ट्विट केले होते. वास्तविक दौंड हे एक महत्त्वाचे रेल्वे स्थानकापैकी एक आहे. महाबळेश्वर, अष्टविनायक या तीर्थक्षेत्राला भेटी देणारे पर्यटक दौंड या रेल्वे स्टेशनवर उतरतात. यामुळे दौंड या रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा देण्यात आला तर या पर्यटकांना देखील या गाडीचा लाभ होईल असं मत जाणकार लोकांकडून तसेच प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- कांदा अनुदानाचा पैसा ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा? तारीख आली समोर; कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली माहिती
दरम्यान याबाबत सोलापूर रेल्वे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार डोहारे यांनी एक मोठी माहिती दिली आहे. नीरज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने अतिशय सखोल अभ्यास करून या गाडीला कुठे थांबे दिले पाहिजेत याबाबत निर्णय घेतला आहे. ही ट्रेन जलद प्रवासासाठी ओळखली जाते. म्हणून प्रवाशांची संख्या आणि ‘वंदे भारत’ मधील एकूण सीट्सची संख्या याचा विचार करून दौंड स्टेशनवर थांबा दिला पाहिजे का याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
तसेच सध्या तरी या प्रकारची कोणतीही तरतूद रेल्वे विभागाच्या वतीनं करण्यात आलेली नसल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. यामुळे तूर्तास दौंड रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची प्रवाशांची मागणीबाबत रेल्वेकडून निर्णय झालेला नाही. भविष्यात मात्र याबाबत निर्णय होऊ शकतो असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- ‘या’ 75 मार्गांवर सुरु होणार वंदे भारत ट्रेन; पुणे, मुंबईला किती Vande Bharat Express मिळणार? पहा संपूर्ण यादी