Mumbai Railway News : राजधानी मुंबईत रेल्वे मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. विशेषता मराठवाड्यातून मुंबईमध्ये रेल्वे मार्गे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी महत्त्वाची बातमी आहे. खरं पाहता, सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 वर रेल्वेच्या माध्यमातून काही आवश्यक कामे केली जाणार आहेत.
यामुळे या दोन लाईनवर ब्लॉक घेण्यात आले आहेत. म्हणून आता आदीलाबाद- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स नंदिग्राम एक्सप्रेसने मराठवाड्यातून येणाऱ्या प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी काही दिवस जाता येणार नाही.
हे पण वाचा :- मुंबईची चांदी होणार ! आता ‘हा’ बहुचर्चित मेट्रो मार्ग ‘या’ महिन्यात होणार सुरू, संपूर्ण रूटची माहिती वाचा इथं
आता या एक्सप्रेसने CSMT ला जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना दादर मध्येच उतरावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदीलाबाद- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स नंदिग्राम एक्सप्रेस 23 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान दादर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत अंशतः रद्द करण्यात आली आहे.
यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना या ट्रेनने आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत जाता येणार नाही, तर दादर येथे उतरून दुसऱ्या ट्रेनने सीएसएमटी ला जावे लागणार आहे, किंवा अन्य वाहतुकीने मुंबईला जावे लागणार आहे. साहजिकच, या लाईन ब्लॉकमुळे मराठवाड्यातील विशेषता या एक्सप्रेसने जाणाऱ्या नागरिकांना मोठा गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. मात्र 30 एप्रिल नंतर ही एक्सप्रेस सुसाट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत जाणार आहे.
हे पण वाचा :- कांदा अनुदानाचा पैसा ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा? तारीख आली समोर; कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली माहिती
वास्तविक, ही नंदीग्राम एक्सप्रेस मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून अति महत्त्वाची गाडी आहे. या ट्रेनने मराठवाड्यातून विशेषता परभणी, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणात प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात. यापैकी बहुतांशी प्रवासी हे सी एस एम टी पर्यंत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत प्रवास करतात.
परंतु सीएसएमटी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 या ठिकाणी लाईन ब्लॉक घेण्यात आल्यामुळे 23 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत ही एक्सप्रेस थेट सीएसएमटी पर्यंत जाणार नसून दादरपर्यंतच राहणार आहे. यामुळे निश्चितच काही दिवस मराठवाड्यातील प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागणार आहे.
हे पण वाचा :- ‘या’ 75 मार्गांवर सुरु होणार वंदे भारत ट्रेन; पुणे, मुंबईला किती Vande Bharat Express मिळणार? पहा संपूर्ण यादी