Mumbai News : मुंबईकरांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे सांताक्रुज ते चेंबूर लींक रोड संदर्भात. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एम एम आर डी ए च्या माध्यमातून शहरात आणि उपनगरात वेगवेगळी विकासाची कामे केली जात आहेत.
एमएमआरडीए ने पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुत गती मार्ग यांना जोडण्यासाठी हा सांताक्रुज ते चेंबूर लींक रोड प्रस्तावित केला आहे. या लिंक रोडचे काम एमएमआरडीएने राज्य शासनाच्या सहकार्याने सुरू केले आहे.
हे पण वाचा :- मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! आता प्रवास होणार सुपरफास्ट, पण….
सध्या या लिंक रोडचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच सांताक्रुज चेंबूर लिंक रोड प्रकल्प प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. हा प्रकल्प जुलै 2023 मध्ये सुरू केला जाईल अशी माहिती एका मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. वास्तविक या प्रकल्पाचे काही टप्पे आधीच सुरू झाले आहेत.
उर्वरित कामे देखील जलद गतीने पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. महानगर आयुक्त एस.व्ही.आर श्रीवासन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत नगर रस्ता-वाकोला उन्नत मार्गाचे ८५ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित काम देखील युद्ध पातळीवर सुरू असून जुलै महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता ‘या’ शहरापर्यंत धावणार ! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मान्यता मिळाली
हा १.४ किमी लांबीचा मार्ग आहे. आता या मार्गाचे जुलैपर्यंत काम पूर्ण होणार असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे. सध्या सांताक्रुज ते चेंबूर दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जवळपास दीड तासांचा कालावधी खर्च करावा लागतो.
पण हा लिंक रोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सांताक्रुज ते चेंबूर चा प्रवास मात्र 30 मिनिटात पूर्ण होऊ शकतो असा दावा केला जात आहे. निश्चितच आता जुलै महिन्यात हा प्रकल्प सुरू होणार असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे.
हे पण वाचा :- मुंबई ते गोवा दरम्यानचा प्रवास होणार सुसाट; ‘हा’ अतिमहत्वाचा मार्ग ‘या’ दिवशी होणार खुला, पहा….