Mumbai News : सध्या ठाणे, मुंबईसह उपनगरात वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे केली जात आहेत. शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी वेगवेगळी रस्ते विकासाची कामे सूरु आहेत. यामध्ये कोस्टल रोड, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, सागरी पूल, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, ऍलिव्हटेड कॉरिडॉर यांसारखे रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. यामध्ये मानखुर्द ते ठाणे या दरम्यानचा प्रवास गतिमान करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा रस्ते विकासाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या अंतर्गत छेडा नगर येथे उड्डाणपुलाचे काम केले जात आहे. हा उड्डाणपूल 1235 मीटर लांबीचा असून याचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर छडा नगर जंक्शन मधील वाहतूक कोंडी फुटेल असा दावा केला जात आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण अर्थातच एम एम आर डी ए च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, हा पूल गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. याच उद्घाटन दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
यामुळे आता मानखुर्द ते ठाणे हा प्रवास अधिक गतिमान होईल असं चित्र तयार होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एम एम आर डी एन ए छेडानगर येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत एकूण तीन उड्डाणपूल निर्मिती होणार आहे. यासोबतच एक सबवे देखील तयार केला जाणार आहे. यामध्ये शिव ते ठाण्याला जोडणाऱ्यां मार्गावर एक 680 मीटर लांबीचा तीन लेनचा उड्डाणपूल आहे.
दुसरा पूल मानखुर्द ते ठाणे दरम्यान असून दोन लेनचा हा पूल राहील अन याची लांबी 1235 मीटर राहणार आहे. तसेच तिसरा छेडा नगर उड्डाणपूल सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याला जोडणार आहे. याची लांबी 638 मीटर असून हा मार्च 2022 मध्ये खुला झाला आहे. विशेष म्हणजे 518 मीटर लांब सबवेचा पहिला टप्पा देखील खुला झाला आहे. आता मानखुर्द ते ठाण्याला जोडणाऱ्या 1235 मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे पूर्ण काम झाले आहे.
हे पण वाचा :- तुम्ही निवडून दिलेल्या आमदारांना किती वेतन मिळत, पेन्शन किती? पगाराचा आकडा अन मिळणाऱ्या सोयी सुविधा पाहून विचारात पडाल, पहा…
आता याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला होणार आहे. याबाबत औपचारिक माहिती समोर आलेली नसली तरी देखील महानगर आयुक्त एस व्ही आर श्रीनिवासन यांनी पुढील सात ते आठ दिवसात हा पूल प्रवाशांसाठी खुला होईल असे सांगितले आहे. यामुळे प्रवाशांचा जवळपास 30 ते 45 मिनिटांचा वेळ वाचू शकतो असा दावा केला जात आहे.
निश्चितच आगामी वर्षात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकां पाहता सध्या शासन, प्रशासनाकडून मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि संपूर्ण राज्यात सुरू असलेली विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सुरू असलेले वेगवेगळे प्रकल्प जलद गतीने पूर्ण केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता 22 मार्च रोजी म्हणजेच गुढीपाडव्याला हा मानखुर्द ते ठाण्याला जोडणारा उड्डाणपूल सुरू केला जाणार आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! म्हाडाच्या पुणे मंडळातील 6058 घरांची सोडत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘या’ दिवशी निघणार