Mumbai News : सध्या राजधानी मुंबई मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळे रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आले आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच एम एम आर डी ए च्या माध्यमातून मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील ट्रॅफिकची समस्या कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकल्पावर काम सुरू आहे. दरम्यान मुंबई मेट्रोपोलीटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी अर्थातच एमएमआरडीए ने आणखी एक रस्ते विकास प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला आहे.
एमएमआरडीएने जे एन पी ए बंदरातून जी अवजड वाहनांची वाहतूक होते आणि यामुळे जी वाहतूक कोंडी होते यावर तोडगा काढण्यासाठी आणि ट्रान्स हार्बर लिंक वरील वाहतूक कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.या पार्श्वभूमीवर एम एम आर डी ए च्या माध्यमातून चिर्ले टोकापासून ते गव्हाण फाटा पर्यंत व पळस्पे फाटा ते मुंबई-पुणे महामार्गापर्यंत ऍलिव्हेटेड कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. यासाठीचा प्रस्ताव प्राधिकरणाकडून तयार झाला आहे.
साहजिकच एलिव्हेटेड रस्ता मुंबई पुणे महामार्गाला कनेक्टिव्हिटी देणारा आहे, यामुळे आता मुंबई ते लोणावळा आणि खंडाळा या दरम्यानचा प्रवास सोयीचा होणार असल्याचा दावा केला जात आहे. या एलिवेटेड रस्त्यामुळे मुंबई ते लोणावळा अन खंडाळा प्रवासातील 90 मिनिटांचा कालावधी वाचणार असून मात्र दीड तासात मुंबईहून या दोन पर्यटन स्थळाला भेट देणे शक्य होणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘त्या’ मार्गावरही धावणार बेस्टची ई-डबल डेकर बस; ‘या’ दिवशी सुरु होणार सेवा
एम एम आर डी ए चे आयुक्त एस व्ही आर श्रीनिवासन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एलिव्हेटेड कॉरिडॉर जवळपास 1352 कोटी रुपये खर्च करून तयार केला जाणार आहे. या कॉरिडोर मुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात फोडली जाणार आहे. त्यामुळे मुंबई पुणे महामार्गावर जलद गतीने जाता येणे शक्य होणार असून प्रवासाचा वेग वाढणार आहे. हा कॉरिडॉर 4.74 हेक्टर जमिनीवर उभारला जाणार आहे. यापैकी 0.236 हेक्टर जमीन ही वनविभागाची राहणार आहे. या कॉरिडॉर प्रकल्प अंतर्गत मुंबई पुणे महामार्गाजवळ तीन-तीन लेनच्या गल्ल्या तयार केल्या जाणार आहेत.
असं राहणार काम
या कॉरिडॉरचा एकूण तीन भागा म प्रस्तावित आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या भागात एनएचकात 348 च्या मध्यभागी चिरले इंटरचेंज ते गव्हाण फाटा पर्यंत सहा पदरी कॉरिडॉर बांधला जाईल. यामध्ये मध्य रेल्वे मार्गाच्या पनवेल उरण विभागात आरओबी राहणार आहे. यासोबतच गव्हाण फाटा येथे डबल डेकर एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधला जाणार आहे.
हे पण वाचा :- काय सांगता ! राजधानी, शताब्दी बंद होणार आता देशात फक्त वंदे भारत एक्सप्रेस धावणार; पहा रेल्वेचा मेगाप्लॅन
दुसऱ्या भागात या प्रकल्पांतर्गत पळस्पे फाटा ते मुंबई पुणे महामार्गापर्यंत सहा पदरी मार्ग तयार केला जाणार आहे. या अंतर्गत पनवेल रोहा रेल्वे मार्गावर उड्डाणपूल बांधला जाईल.
या प्रकल्पा अंतर्गत तिसऱ्या भागात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ते मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग पर्यंत रहदारीसाठी दोन पदरी यूपी रॅम्प तयार केला जाणार आहे. यासोबतच पळस्पे फाटा ते मुंबई पुणे महामार्गापर्यंत सिमेंट काँक्रेटच्या फुटपाथचे रुंदीकरण केले जाणार आहे.
निश्चितच या प्रस्तावित प्रकल्पामुळे मुंबई ते मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पोहोचणे सोयीचे होईल, यामुळे साहजिकच मुंबईहून लोणावळा आणि खंडाळा यांसारख्या पर्यटन स्थळाला जाणे सोयीचे होणार आहे. सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठी मदत होणार आहे. यामुळे मुंबईमधील वाहतुकीचा वेग वाढेल प्रवाशांना कमी वेळेत प्रवास करता येईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला मिळणार गती, 16,039 कोटी रुपये खर्च, 235 किलोमीटर लांबी; ‘त्या’ 102 गावात सुरू होणार भूसंपादन