Mumbai News : मुंबईकरांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे. आता राजधानी मुंबईमध्ये दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन, प्रशासनाच्या माध्यमातून जोमात कार्य सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता बेस्टने मुंबईकरांना एक मोठे गिफ्ट दिल आहे. बेस्ट मुंबईकरांसाठी सीएसएमटी स्टेशन ते कफ परेड (बॅकबे डेपो) मार्ग 138 वर दुसरी इलेक्ट्रिक डबल डेकर बस चालवणार आहे.
याची माहिती बेस्टच्या माध्यमातून शुक्रवारी देण्यात आली. बेस्टने दिलेल्या माहितीनुसार या मार्गावर उद्यापासून अर्थातच 12 मार्चपासून ई-डबल डेकर बस सुरू होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे नुकतेच फेब्रुवारीमध्ये बेस्टच्या माध्यमातून पहिले इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली.
ही पहिलीवहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस सीएसएमटी-एनसीपीए (नरीमन पॉइंट) मार्गावर धावत असून या बसला मुंबईकरांच्या माध्यमातून मोठी पसंती दिली जात आहे. पहिली इलेक्ट्रिक बसला पसंती लाभल्यानंतर बेस्टच्या माध्यमातून दुसरी इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता उद्यापासून बेस्टची ही दुसरी इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरू होणार आहे.
हे पण वाचा :- काय सांगता ! राजधानी, शताब्दी बंद होणार आता देशात फक्त वंदे भारत एक्सप्रेस धावणार; पहा रेल्वेचा मेगाप्लॅन
या बसला देखील प्रवाशांकडून पसंती लाभेल असा बेस्टचा दावा आहे. कफ परेड (बॅकबे डेपो) मार्ग 138 हा एक वरदळीचा मार्ग असून या ठिकाणी कायमच गर्दी असते. यामुळे या मार्गावर बेस्टने दुसरी डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरू केली आहे. यासोबतच बेस्टच्या माध्यमातून काही जुन्या डबल डेकर बसेस नवीन मार्गावर ट्रायल म्हणून चालवल्या जात आहेत.
सध्या स्थितीला बेस्ट कडे 45 जुन्या डिझेलवर चालणाऱ्या डबल डेकर बसेस आहेत ज्या वेगवेगळ्या मार्गावर ट्रायल म्हणून चालवल्या जात आहेत. येत्या काही दिवसात बेस्ट कडून अजून डबल डेकर बसेस वेगवेगळ्या मार्गावर सुरू केल्या जाणार आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट लवकरच जुन्या डबल डेकरची जागी नवीन इलेक्ट्रिक डबल डेकर बसेसला सुरू करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे ट्रायल साठी ज्या जुन्या डबल डेकर बसेस वेगवेगळ्या मार्गावर धावत आहेत त्या ठिकाणी नवीन इलेक्ट्रिक डबल डेकर बसं सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगितले जात आहे.
हे पण वाचा :- नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला मिळणार गती, 16,039 कोटी रुपये खर्च, 235 किलोमीटर लांबी; ‘त्या’ 102 गावात सुरू होणार भूसंपादन
बेस्टच्या ताब्यात दर महिन्याला वीस ते पंचवीस अशा इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस येण्याची अपेक्षा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त होत असून यामुळे मुंबईमधील दळणवळण व्यवस्था आगामी काही दिवसात आणखी सक्षम होणार असल्याचे सांगितले जात आहे. एका अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी अखेर मुंबईमध्ये 200 बसेस या प्रकारच्या धावतील.
मिळालेल्या माहितीनुसार, मरीन ड्राइव्हच्या पुढे जाणार्या मार्ग क्रमांक 123 सह काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेल्या सर्व मार्गांवर या इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस सुरू होणार आहेत. सोबतच आर सी चर्च ते ताडदेव आणि विलेपार्ले स्टेशन ते जुहू या मार्गांवर देखील या बसेस येत्या काही दिवसात धावतील असं सांगितलं जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या डबल डेकर बसेस मध्ये 80 ते 90 प्रवासी प्रवास करू शकतात. यामुळे निश्चितच मुंबईकरांना शहरादरम्यान प्रवास करण्यासाठी येत्या काही दिवसात आणखी सोयीचे होईल. यामुळे राजधानी मुंबईमधील वाहतूक व्यवस्था अजूनच बळकट होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता कलबुर्गीपर्यंत धावणार; रूटमध्ये आणि वेळेत बदल होणार का? वाचा सविस्तर