Mumbai Metro Railway News : मुंबईमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी वेगवेगळे रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. शिवाय मेट्रो मार्ग देखील जलद गतीने सुरू केले जात आहेत. यामध्ये वांद्रे ते सीप्झ या मेट्रो मार्गाचा देखील समावेश आहे. दरम्यान आता या मार्गाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य दिल आहे.
फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आरे कार शेडचे काम जवळपास 54 टक्के पूर्ण झाले आहे. याचे संपूर्ण काम येत्या वर्ष अखेर पूर्ण होणार आहे. मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी ही मोठी माहिती सार्वजनिक केली आहे. त्यांनी सांगितले की मेट्रो 3 मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच वांद्रे ते सीप्झ येत्या वर्षाअखेरीस किंवा जानेवारीपर्यंत सुरू करण्यात येणार आहे.
हे पण वाचा :- केंद्रे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; जगातील ‘या’ सर्वाधिक उंचीच्या पुलावर धावणार आता वंदे भारत एक्सप्रेस
निश्चितच गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला हा मार्ग प्रवाशांसाठी लवकरच आता सेवेत येणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक गतिमान होणार असून मुंबईकरांना याचा मोठा फायदा होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मुंबईमधील मेट्रो तीन हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे.
हा प्रकल्प तब्बल 40 किलोमीटर लांबीचा भूमिगत मेट्रो मार्ग प्रकल्प आहे. आशियातील सर्वात लांब सिंगल लाईन असलेला हा प्रकल्प निश्चितच मुंबईच्या वैभवात भर घालणारा आहे. हा प्रकल्प शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असला तरीदेखील गेल्या सरकारच्या काळात या प्रकल्पाचे काम रखडले होते.
हे पण वाचा :- आताची सर्वात मोठी बातमी! ‘या’ महिन्यात मिळणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता; ‘या’ आहेत अटी, वाचा….
आरे कारशेडमूळे या प्रकल्पाच्या कामाला ब्रेक लागला होता. पण आता राज्यात आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने या प्रकल्पाला पुन्हा एकदा गती देण्याचे काम केले आहे. आता डिसेंबर अखेर आरे कारशेड चे काम पूर्ण होणार आहे यामुळे हा प्रकल्प नवीन वर्षात प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची आशा आता व्यक्त होऊ लागली आहे.
दरम्यान मेट्रो मार्ग प्रकल्प 3चे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील जलद गतीने सुरू असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. एकंदरीत या बहुचर्चित मार्गाच्या उद्घाटनाची थेट तारीखच फडणवीस यांनी सांगितली असल्याने मुंबईकरांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
हे पण वाचा :- पुणे-सिकंदराबाद दरम्यान आता शताब्दी ऐवजी वंदे भारत एक्सप्रेस धावणार? समोर आली तिकीट दराबाबत मोठी माहिती, पहा…..