Mumbai Job News : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी खुशखबर समोर येत आहे ती मुंबई हायकोर्टातून. विशेषता ज्यांना मुंबईत अन बॉम्बे उच्च न्यायालयात नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही तर आनंदाची पर्वणीच राहणार आहे. बॉम्बे हायकोर्टाने कायदा लिपिक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
यासाठी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. यामुळे आज आपण या पदाच्या किती जागासाठी भरती आयोजित झाली आहे, अर्ज कसा करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची दिनांक कोणती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, आणि पगाराबाबत महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
हे पण वाचा :- Job Alert : खुशखबर ! ‘या’ बँकेत निघाली भरती; ग्रॅज्युएशन केलं असेल तर आजच करा अर्ज
किती जागासाठी होणार आहे भरती?
बॉम्बे हायकोर्टाच्या माध्यमातून कायदा लिपिक या पदाच्या 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज कसा करायचा?
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे. रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजू, बॉम्बे, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी हॉस्पिटल कंपाऊंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एलटीमार्ग, मुंबई – 400 001 या पदावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वर नमूद करण्यात आलेल्या पत्त्यावर 20 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी खुशखबर ! अहमदनगर महापालिकेमध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी निघाली भरती; आजच करा अर्ज
आवश्यक शैक्षणिक पात्रता
कायदा लिपिक या पदासाठी नवीन कायदा पदवीधर ज्यांनी एलएलबीची अंतिम परीक्षा पहिल्याच प्रयत्नात किमान 55% गुणांसह उत्तीर्ण केली आहे असे उमेदवार पात्र राहणार आहेत. किंवा, कायद्यात पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार या पदासाठी पात्र राहतील. किंवा, उच्च न्यायालय कायद्यातील पदव्युत्तर पदवी धारण केलेले उमेदवार पात्र राहणार आहेत.
शैक्षणिक पात्रता आणि इतर तत्सम बाबी योग्यरीत्या समजून घेण्यासाठी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. अधिसूचना वाचण्यासाठी बॉम्बे हायकोर्ट 2023 पदभरती या लिंक वर क्लिक करा.
ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा असल्याने अर्ज हा विहित नमुन्यात भरणे आवश्यक आहे. यामुळे अर्ज डाऊनलोड करण्यासाठी बॉम्बे हायकोर्ट 2023 कायदा लिपिक अर्ज या लिंक वर क्लिक करा.
हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! सरकारी नोकर भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ झाली फिक्स; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार निर्णय