Job Alert : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता, ज्यांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे अशा तरुणांसाठी ही तर आनंदाचीच पर्वणी राहणार आहे. कारण की कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मध्ये पदभरती निघाली आहे.
या बँकेत लिपिकच्या रिक्त जागा भरल्या जात आहेत. त्यासाठी अधिसूचना जारी झाली आहे. मात्र या पदभरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे.
अशा परिस्थितीत आज आपण किती जागांसाठी भरती निघाली आहे, ऑफलाइन अर्ज कुठे पाठवायचा, अर्ज करण्याची शेवटची दिनांक, आवश्यक पात्रता, परीक्षा फी यांसारख्या बाबींची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- पहिल्यांदा होम लोन घेताय का? मग ‘या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा फायद्यात राहाल
किती जागांसाठी आहे भरती? :- कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड या ठिकाणी एकूण 17 लिपिकच्या जागा भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :- या पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले असणे अनिवार्य राहणार आहे. सोबतच बँकिंग व सहकार संबंधित शिक्षण घेतलेले राहणे अनिवार्य राहणार आहे. उमेदवाराने मात्र अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचून पात्रता जाणून घेणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा :- या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा जास्तीत जास्त 35 वर्षे वयाचा असला पाहिजे. म्हणजेच 35 वर्षांवरील उमेदवारांना या बँकेत लिपिक पदासाठी अर्ज करता येणार नाही.
परीक्षा फी :- लिपिक पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून यासाठी परीक्षा फी 590 रुपये घेतली जाणार आहे.
हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! सरकारी नोकर भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ झाली फिक्स; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार निर्णय
नोकरी करण्याचे ठिकाण :- साहजिकच नोकरी करण्याचे ठिकाण हे कोल्हापूर राहणार आहे.
अर्ज कसा करायचा :- अर्ज हा इच्छुक आणि पात्र उमेदवाराला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. पोस्ट बॉक्स नंबर 304 कोल्हापूर सिटी हेड ऑफिस 41 60 12 या ठिकाणी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज सादर करावा लागणार आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक :- या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने वरनमूद केलेल्या पत्त्यावर सात मार्च 2023 पूर्वी आपला अर्ज सादर करावा लागेल. यानंतर सादर झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
जाहिरातीची पीडीएफ :- या जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पदभरती 2023या लिंक वर क्लिक करा.
हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी खुशखबर ! अहमदनगर महापालिकेमध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी निघाली भरती; आजच करा अर्ज