Mhada Lottery News : महानगरात स्वतःचा हक्काचं घर घेणं हे गेल्या काही वर्षात महागल आहे. वाढती लोकसंख्या, वाढलेली महागाई या सर्वांच्या पार्श्वभूमीवर घर बांधणे आता सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरची गोष्ट बनली आहे. यामुळे सर्वसामान्य लोक आपलं स्वप्नातील घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या कमी किमतीत आणि परवडणाऱ्या घरांची नेहमीच वाट पाहत असतात. म्हाडा मुंबई पुणे औरंगाबाद नासिक या महानगरात कायमच घरांची सोडत काढत असते.
दरम्यान आता म्हाडाच्या कोकण मंडळाअंतर्गत घरांची सोडत काढण्यात आली आहे. आज म्हाडाच्या कोकण मंडळा अंतर्गत 4752 घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण या घर सोडतीसाठी प्रत्यक्ष अर्ज विक्री केव्हा सुरू होणार, नागरिकांना अर्ज कोणत्या तारखेपासून करता येणार, अर्जाची शेवटची दिनांक, अनामत रक्कम भरण्याची शेवटची दिनांक तसेच कोणत्या दिवशी लॉटरी निघणार? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- Shirdi News : काय सांगता….! मुंबई-सोलापूर अन मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन बंद होणार का?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोकण मंडळांतर्गत 4752 घरांसाठीची आज जाहिरात प्रसिद्ध होणार असून यामध्ये प्रथम येणाऱ्या प्राधान्य या योजनेअंतर्गत 2048 घरांचा देखील समावेश राहणार आहे. या योजनेअंतर्गत उपलब्ध होणारी घरे ही अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी राहणार आहेत. या घरांची किंमत साधारणता 23 लाख ते 41 लाख दरम्यान राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
यासोबतच या घर सोडतीमध्ये पंतप्रधान आवास योजनेची 984 घरे राहतील. तसेच 1554 घरे ही विकासकांकडून उपलब्ध करून देण्यात आलेले असतील म्हणजेच म्हाडाची जी काही 20% ची योजना आहे त्याची घरे राहतील. तर उर्वरित घरे ही म्हाडा मंडळाची राहणार आहेत. आता आपण या घर सोडतसंदर्भातील ज्या काही महत्त्वाच्या तारखा आहेत त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
4752 घरांसाठीची जाहिरात :- आज म्हणजे 6 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध होईल.
अर्ज विक्री केव्हा होणार :- यासाठी अर्ज विक्री 8 मार्च 2023 पासून सुरू होईल.
अनामत रकमेसह अर्ज भरण्याची शेवटची तारीख :- अनामत रकमेसह अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2023 राहणार आहे.
घरांसाठी लॉटरी केव्हा काढली जाईल :- कोकण मंडळाअंतर्गत आज जाहिरात प्रसिद्ध होणाऱ्या या घरांसाठीची लॉटरी 10 मे रोजी ठाणे येथील डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी सकाळी दहा वाजता काढली जाणार आहे.
हे पण वाचा :- गृह कर्ज घेण्याचा विचार करताय का? मग ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा, बँक कोणतीही असो डॉक्युमेंट सारखेच लागतील, वाचा डिटेल्स