Home Loan Document List : महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन, सिमेंट, लोखंड यांचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. यामुळे आता घर बांधणे पूर्वीच्या तुलनेत खूपच महाग झाले आहे. शिवाय पुढील काळात घरबांधणी याहीपेक्षा महाग होणार आहे. महागाई जेवढ्या जलद गतीने वाढेल तेवढ्याच जलद गतीने घर बांधण्यासाठी येणारा खर्चही वाढणार आहे.
यामुळे अनेकजण घर बांधण्यासाठी गृह कर्ज घेतात. निश्चितच गृह कर्ज घर बांधण्यासाठी नागरिकांना मोठी मदत करते आणि त्यांचं स्वप्नातील घर तयार होतं. विशेष बाब म्हणजे अनेक बँका सवलतीच्या व्याजदरात अलीकडे गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत. काही सण उत्सव प्रसंगी काही बँकांकडून आकर्षक ऑफर देखील दिले जाते.
मात्र असे असले तरी कोणत्याही बँकेतून कर्ज घेताना काही कागदपत्रांची पूर्तता या ठिकाणी करावी लागते. बँक कुठलीही असली तरी देखील कागदपत्र अपूर्ण असताना बँकेकडून गृह कर्ज मिळत नाही. यामुळे आज आपण जर एखाद्या व्यक्तीला होम लोन किंवा गृह कर्ज घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीला कोण-कोणती कागदपत्रे तयार ठेवावी लागतील याविषयी थोडक्यात उहापोह करणार आहोत.
गृह कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
खरं पाहता, नागरिकांना बहुसंख्य बँका गृह कर्ज उपलब्ध करून देतात. बँक कोणतीही असली मात्र कागदपत्र सहसा समानच असतात. यामुळे आज आपण स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रांची यादी जाणून घेणार आहोत.
गृह कर्जासाठी व्यवस्थित रित्या भरलेला संबंधित बँकेतील अर्ज आणि पासपोर्ट आकाराचे फोटो.
सोबतच एम्प्लॉयर आयडेंटिटी कार्ड देखील लागत.
पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड यापैकी एक ओळखपत्र.
टेलिफोन बिलाची प्रत, वीज बिल, पाणी बिल, गॅस पाईपलाईन बिलाची प्रत, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड ची प्रत यापैकी एक लागेल.
त्यासोबतच काही मालमत्ता संदर्भातील कागदपत्रे लागतात. यामध्ये विक्रीसाठी नोंदणीकृत करार ( महाराष्ट्रातील अर्जदाराला आवश्यक ) तसेच विक्रीसाठीचा मुद्रांक करार लागतो.
याशिवाय ताबा प्रमाणपत्र ( महाराष्ट्रातील गृह कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना आवश्यक)
यामध्ये शेअर सर्टिफिकेट, देखभाल बिल, विज बिल, मालमत्ता कर पावती आवश्यक आहे.
याशिवाय घराच्या प्लॅनची मंजूर कॉपी ज्याला आपण ब्लू प्रिंट म्हणतो त्याची झेरॉक्स लागेल, बिल्डरचा नोंदणीकृत विकास करार, तसेच नवीन मालमत्तेसाठी कन्व्हेअन्स डिड लागणार आहे.
हे पण वाचा :- बातमी कामाची ! पुणे मंडळातील घर सोडतीची पात्र लाभार्थ्यांची प्रारूप यादी जाहीर; कशी पाहणार यादी, पहा
यासोबतच संबंधित कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदार व्यक्तीला त्याने बिल्डर किंवा घर विक्रेत्याला दिलेली देयके दर्शवणारी पुरावे सादर करावे लागतात. यामध्ये देयक पावती तसेच बँक खात्याचे वितरण आवश्यक आहे.
यासोबतच कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला आपल्या बँकेचे अकाउंट स्टेटमेंट द्यावे लागते. साधारणपणे सहा महिन्यातील बँक खात्याची स्टेटमेंट आवश्यक असते.
यासोबतच जर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने यापूर्वी एखाद्या बँकेतून कर्ज घेतलेल असेल आणि अद्याप ते कर्ज फिटलेले नसेल तर त्यासंबंधी आवश्यक माहिती बँकेला द्यावी लागते आणि यासाठी कर्ज खात्याचे विवरणपत्र सादर करावे लागते.
यासोबतच पगारदार अर्जदार सह अर्जदार गॅरेंटरला आपल्या उत्पन्नाचे पुरावे सादर करावे लागतात. यामध्ये वेतन स्लिप किंवा पगार प्रमाणपत्राचा समावेश असतो.
तसेच दोन वर्षांच्या आयटी रिटर्नच्या परत द्याव्या लागतात नाहीतर मग मागील दोन वर्षाच्या फॉर्म 16 ची प्रत द्यावी लागते.
जर कर्ज घेणारा अर्जदार सहकारी अर्जदार गॅरेंटर बिना पगारी असेल म्हणजेच सेल्फ एम्प्लॉयमेंट असतील तर त्यांना आपल्या व्यवसायास संबंधित काही पुरावे सादर करावे लागतात. यामध्ये व्यवसायाचा पत्त्याचा पुरावा, व्यवसायाचा पुरावा, तसेच गेल्या तीन वर्षांपासूनचे आयटी रिटर्न्स, यासोबतच गत तीन वर्षांची बॅलन्स शीट आणि एन्ड लॉस अकाउंट लागते. यासोबतच व्यवसायाचा परवाना म्हणजे लायसन्स देखील या ठिकाणी लागतं. जर एखाद्या व्यक्तीला फॉर्म 16a लागू असेल तर त्याला टीडीएस प्रमाणपत्र देखील द्याव लागत.
यासोबतच जे व्यक्ती सीए डॉक्टर आणि इतर प्रोफेशनल व्यावसायिक असतात यांना त्यांच्या पात्रते संदर्भात काही पुरावे द्यावे लागतात. त्यामध्ये पात्रता प्रमाणपत्र आवश्यक असते.