Mhada Lottery 2023 : मुंबई, पुणे, नासिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महानगरात घर खरेदी करणे अलीकडे महागल आहे. घरांच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घर मिळावे म्हणून म्हाडाकडून घर उपलब्ध करून दिले जातात. सर्वसामान्यांचे देखील म्हाडाच्या घर सोडतीकडे कायमच लक्ष असते.
मुंबई आणि कोकण मंडळातील घर सोडती साठी देखील गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहिली जात होती. दरम्यान कोकण मंडळाकडून घर सोडत जारी करण्यात आली आहे. यासाठी सध्या स्थितीला अर्ज स्वीकृतीची आणि अनामत रकम भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोकण मंडळाकडून 4752 घरांसाठीची सोडत जारी करण्यात आली आहे. या सोडतीमध्ये ठाणे, वसई विरार, नवी मुंबई, कल्याण या ठिकाणी असलेल्या घरांचा समावेश आहे.
मात्र म्हाडाच्या माध्यमातून या सोडतीपासून अनामत रकमेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता म्हाडाच्या घरांसाठी असलेल्या अनामत रकमेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान आज आपण कोकण मंडळाकडून अनामत रकमेत किती वाढ झाली आहे? या 4752 घरांसाठीच्या सोडतीसाठी कधीपर्यंत अनामत रक्कम भरता येणार आहे, तसेच या सोडतेची प्रारूप यादी, अंतिम यादी केव्हा जाहीर होईल? याशिवाय या घरांसाठीची सोडत म्हणजेच लॉटरी केव्हा निघेल याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदवार्ता ! लवकरच मिळणार वंदे भारतची भेट; ‘या’ रूटवर धावणार, प्रवाशांचा दीड तासांचा वेळ वाचणार, पहा…..
अनामत रकमेत किती झाली वाढ?
कोकण मंडळांनी या घर सोडतीपासून अनामत रकमेत वाढ केली आहे. आता कोकण मंडळांतर्गत घर सोडती मध्ये अर्ज करणाऱ्या लोकांना अनामत रक्कम अधिक द्यावी लागणार आहे. आरटीजीएस-एनईएफटीद्वारे अनामत रक्कम इच्छुकांना भरता येणार आहे. आता पंतप्रधान आवास योजना, म्हाडाच्या घरांसाठी आणि 20% योजनेच्या घरांसाठी अत्यल्प गटाला 10 हजार रुपये, अल्प गटासाठी 20 हजार, मध्यम गटासाठी 30 हजार आणि उच्च गटासाठी 40 हजार रुपये अशी अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
या घर सोडतीमध्ये प्रथम येणाऱ्या प्राधान्य या योजनेअंतर्गत देखील घरांचा समावेश आहे. या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या घरांसाठी देखील या सोडतीपासून कोकण मंडळाकडून अनामत रकमेत वाढ करण्यात आली आहे.
यामध्ये अत्यल्प गटासाठी 25 हजार, अल्पसाठी 50 हजार, मध्यमसाठी 75 हजार आणि उच्चसाठी एक लाख रुपये अशी अनामत रक्कम राहणार आहे. यासोबतच अर्जदार व्यक्तीला अर्ज शुल्क म्हणून 590 रुपये देखील भरावे लागणार आहेत. जे व्यक्ती सोडतीत अयशस्वी होतील म्हणजे ज्यांची लॉटरीमध्ये नावे येणार नाहीत अशा व्यक्तींना आठ दिवसात ही अनामत रक्कम वापस केली जाणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठा निर्णय ! आता ट्रेनची कमान ‘ती’च्या हातात
कोकण मंडळाच्या 4752 घरांसाठीच्या सोडतीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
अनामत रक्कम सादर करण्याची अंतिम दिनांक :- या सोडतीसाठी 12 एप्रिल पर्यंत अनामत रक्कम भरता येणार आहे.
प्रारूप यादी केव्हा प्रसिद्ध होणार :- 27 एप्रिल रोजी प्रारूप यादी जारी होणार आहे.
कोणत्या तारखेपर्यंत हरकती नोंदवता येतील :- 28 एप्रिल पर्यंत अर्जदारांना हरकती नोंदवता येणार आहेत.
अंतिम यादी केव्हा प्रसिद्ध होईल :- चार मे रोजी अंतिम यादी जारी होणार आहे.
सोडत केव्हा जारी होईल :- दहा मे रोजी सकाळी दहा वाजता ठाणे येथील डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी या कोकण मंडळाच्या 4752 घरांसाठीची सोडत जारी होणार आहे.