Solapur Railway News : मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊन जवळपास एक महिन्याहुन अधिकचा कालावधी उलटला आहे. 10 फेब्रुवारी 2023 रोजी या ट्रेनची सुरुवात दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे करण्यात आले आहे. या ट्रेनला एक महिना पूर्ण झाला असून प्रवाशांची मोठी पसंती लाभत आहे. हेच कारण आहे की मध्य रेल्वेच्या माध्यमातून या ट्रेनचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.
ही ट्रेन आता कलबुर्गी पर्यंत सुरू केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वता मान्यता दिली असल्याची माहिती पुढे आली आहे. अशातच आता मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक मोठा निर्णय झाला आहे. या ट्रेनची कमान आता एका महिला पायलटच्या हाती आली आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सुरेखा यादव यांच्याकडे आता या ट्रेनची जबाबदारी आहे.
वास्तविक सुरेखा या आशियातील पहिल्या महिला लोको पायलट म्हणून संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त आहेत. त्यांनी 13 मार्च 2023 रोजी मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनचे पायलट म्हणून काम पाहिले. यावेळी सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकावर सत्कार देखील करण्यात आला. त्यांनी सांगितले की, नवीन काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनमध्ये आहे, अन या ट्रेनचे पायलट म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
निश्चितच आता वंदे भारतची कमान तीच्या हाती आहे, यामुळे महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत याच हे एक उत्तम उदाहरण राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की देशभरात एकूण दहा वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.
यामध्ये चार आपल्या महाराष्ट्रात आहेत. मुंबई-गांधीनगर, नागपूर-बिलासपूर, मुंबई-साईनगर शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या रूटवर धावणाऱ्या चार वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रात आहे. संपूर्ण भारतीय बनावटीच्या या वंदे भारत ट्रेनमुळे भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलला असून रेल्वेचा प्रवास आता अधिक गतिमान आणि सुरक्षित तसेच आरामदायी बनला आहे.