Medicinal Plant Farming : भारतीय शेतीत (Farming) गेल्या काही वर्षात मोठा बदल बघायला मिळत आहे. शेतकरी बांधव (Farmer) आता बाजारात मागणी मध्ये असलेल्या पिकांची शेती (Agriculture) करू लागले आहेत.
औषधी पिकांची देखील बाजारात मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत औषधी वनस्पतींची शेती शेतकऱ्यांना मोजक्या काही दिवसातच चांगले उत्पन्न मिळवून देत आहे. अलीकडच्या काळात औषधी वनस्पतीच्या (Medicinal Crops) शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
अशीच एक औषधी वनस्पती आहे अश्वगंधा (Ashwagandha Crop). या पिकाची लागवड हा शेतकऱ्यांसाठी अधिक कमाईचा उत्तम पर्याय बनला आहे. अश्वगंधा हे अशा औषधी पिकांपैकी एक आहे जे कमी वेळेत जास्त उत्पादन देते.
हे आयुर्वेदिक औषध आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये सर्वात जास्त वापरले जाते. औषधी गुणधर्मांमुळे अश्वगंधाची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे इतर औषधी वनस्पतींच्या तुलनेत अश्वगंधा शेतीतून (Ashwagandha Farming) अधिक कमाई केली जात असल्याचा दावा केला जात आहे.
अश्वगंधा लागवडीसाठी माती आणि हवामान
अश्वगंधाची लागवड खरीप हंगामात केली जाते. त्याच्या लागवडीसाठी 25 ते 30 अंश तापमान सर्वात योग्य आहे. चांगल्या उत्पादनासाठी जमिनीतील ओलावा आणि कोरडे वातावरण आवश्यक आहे. यासाठी, वालुकामय चिकणमाती किंवा लाल माती सर्वोत्तम मानली जाते, ज्याचे पीएच मूल्य 7.5 ते 8.0 दरम्यान असते.
अश्वगंधासाठी शेतीची तयारी
शेतात पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था असावी.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेताची 2-3 वेळा नांगरणी करावी.
नांगरणी करून आणि फळी चालवून शेतातील माती भुसभुशीत करावी.
चांगल्या पिकासाठी शेतात एकरी 6 किलो नत्र मिसळावे.
शेत तयार करताना शेणखत मातीत मिसळावे.
सिंचन आणि तण नियंत्रण
तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी खुरपणी करावी.
पेरणीनंतर 45 ते 50 दिवसांनी दुसरी खुरपणी करावी.
पावसाळ्यात सिंचनाची फारशी गरज नसते.
15 ते 20 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
अश्वगंधा लागवडीतील खर्च आणि उत्पादन
पेरणीनंतर 150 ते 170 दिवसांत पीक तयार होते.
प्रति एकर 5 ते 7 क्विंटल कोरडे मुळ्या मिळतात.
एकरी 20 ते 24 किलो बियाणे मिळू शकते.
अश्वगंधा लागवडीसाठी एकरी सुमारे 1 लाख खर्च येतो.
बाजारात अश्वगंधाची किंमत 50 हजार रुपये प्रति क्विंटल आहे.