Maharashtra Weather Update : यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत फारसा उकाडा जाणवत नव्हता. यामुळे यंदा उन्हाळा आहे की नाही? हे समजतच नव्हते. मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हात वाढ झाली. राज्यातील तापमान 40°c ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले.
मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि कोकणात तापमानामुळे अंगाची अक्षरशः लाही-लाही होत होती. मात्र 20 ते 22 दिवसांतच नागरिक उन्हाळ्याला हैराण झाले होते. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट होत आहे.
आगामी काही दिवसात मान्सून राज्यात दाखल होणार असल्याने तत्पूर्वी तापमानात घट होत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही भागात मानसून पूर्व पावसाचे देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेले माहितीनुसार पुढील काही दिवस राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची
शक्यता राहणार आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, येत्या मंगळवारपासून अर्थातच 30 मे 2023 पासून ते दोन जून 2023 पर्यंत मुंबई सह संपूर्ण कोकणात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
यासोबतच उर्वरित महाराष्ट्रात देखील ढगाळ हवामान आणि काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याचे आयएमडीने यावेळी सांगितले आहे. निश्चितच पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा :- तयारीला लागा….! मान्सून लवकरच येतोय; आजपासून राज्यात मानसूनपूर्व पावसाला होणार सुरुवात, कुठं पडणार पाऊस? पहा…
केव्हा येणार मान्सून
शेतकरी बांधव मात्र मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. अशातच शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी समोर येत आहे. आयएमडीने यंदा मान्सूनचे आगमन राज्यात वेळेतच होईल असा अंदाज बांधला आहे. अर्थातच 7 जून 2023 ला यंदा मान्सूनचे तळकोकणात आगमन होण्याची शक्यता आहे.
या आधी भारतीय हवामान विभागाने मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात उशिरा होणार असा अंदाज बांधला होता. मात्र आता आपला पूर्वीचा अंदाज भारतीय हवामान विभागाने फिरवला असून मान्सूनचे वेळेत आगमन होणार असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक अतिशय आनंदाची बातमी राहणार आहे. हवामान विभागाच्या या अंदाजामुळे शेतीकामाची लगबग वाढणार असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान देखील स्पष्टपणे झळकत आहे.