शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! हवामान विभागाचा दुसरा मान्सून अंदाज जाहीर; ‘या’ जिल्ह्यात यंदा कमी पाऊस पडणार ! तुमच्या भागात कसा असेल पाऊस? वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon 2023 : शेतकरी सध्या खरीप हंगामासाठी पूर्वतयारी करण्यात व्यस्त आहेत. सोबतच शेतकऱ्यांचे मान्सून कडे देखील लक्ष लागून आहे. मान्सूनची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. भारतीय हवामान विभागाने नुकताच मान्सून संदर्भात पहिला अंदाज व्यक्त केला होता.

दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून मान्सूनचा दुसरा सुधारित हवामान अंदाज समोर आला आहे. मात्र चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना या अंदाजामुळे थोडासा धक्का बसण्याची शक्यता आहे.

कारण की जून महिन्यात संपूर्ण देशात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार असं आयएमडीने वर्तवलेल्या या नवीन हवामान अंदाजात म्हटले आहे. मात्र जून ते सप्टेंबर या काळात 96% पाऊस पडणार असा आपला पूर्वीचा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे.

हे पण वाचा :- तयारीला लागा….! मान्सून लवकरच येतोय; आजपासून राज्यात मानसूनपूर्व पावसाला होणार सुरुवात, कुठं पडणार पाऊस? पहा…

यंदा महाराष्ट्रातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार जून ते सप्टेंबर या पावसाळी काळात  पावसाळी काळात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

म्हणजेच मराठवाड्यातील आणि उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो अशी शक्यता आहे.मात्र या चार महिन्याच्या दीर्घ काळात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे.

यासोबतच मराठवाडा आणि विदर्भात जून महिन्यामध्ये कमी पाऊस राहणार असून तापमानात वाढ कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

हे पण वाचा :- कृषी क्रांती योजना : ‘या’ समाजातील शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी मिळते 3 लाख 65 हजाराचे अनुदान; योजनेचे स्वरूप, अर्ज, पात्रताविषयी वाचा…..

तसेच अल निनोचा प्रभाव देखील मान्सूनवर पाहायला मिळू शकतो असे मत आता भारतीय हवामान विभागाने देखील व्यक्त केले आहे. निश्चितच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही एक चिंतेची बाब राहणार आहे. दरम्यान आता भारतीय हवामान विभागाचा मान्सून बाबतचा तिसरा अहवाल केव्हा सादर होतो याकडे लक्ष लागून राहणार आहे.

साधारणतः हा अहवाल भारतीय हवामान विभाग जुलै महिन्यात सादर करत असते. यामुळे आता जुलैमध्ये हवामान विभाग काय अंदाज व्यक्त करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, बाजरीच्या ‘या’ जातीची लागवड करा, दर्जेदार उत्पादन मिळणार, वाचा याच्या विशेषता

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा