Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबांसाठी आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता. राज्य शासनाने त्यावेळी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागतच करण्यात आले होते. गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद होता आणि याच निर्णयाची आता पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली जाणार आहे.
हिंदू नववर्ष अर्थातच गुढीपाडव्याला तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला देखील राज्य शासन आनंदाचा शिधा देणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 23 फेब्रुवारी रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. राज्य अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून हा शासन निर्णय जारी करण्यात आला होता.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस बाबत रेल्वे विभागाने दिली ‘ही’ मोठी माहिती ! प्रवाशांना लवकरच मिळणार ‘हा’ लाभ, वाचा सविस्तर
या निर्णयाअनुसार आता राज्यातील गोरगरीब कुटुंबांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा उपलब्ध होणार आहे. या आनंदाच्या शिधामध्ये रवा डाळ साखर तेल हे उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अर्थातच 14 एप्रिलचा नवबौद्ध बांधवांचा मोठा सण आनंदात साजरा होणार आहे.
यामुळे गोरगरीब जनतेला निश्चितच मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या सुखात सामील होण्यासाठी राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय गोरगरीब जनतेसाठी फायद्याचा सिद्ध होणार आहे. म्हणजेच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर तसेच एक लिटर पामतेल 100 रुपयात दिलं होतं.
आता गुढीपाडव्याला आणि महामानव डॉक्टर आंबेडकर जयंतीला देखील आनंदाचा शिधा पुन्हा एकदा दिला जाणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार दिवाळीमध्ये ज्या गरीब कुटुंबांना आनंदाचा शिधा दिला गेला होता त्याच गरीब कुटुंबांना गुढीपाडव्याला आणि 14 एप्रिल च्या सणाला पुन्हा एकदा आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. दिवाळीप्रमाणेच मात्र शंभर रुपयात हा आनंदाचा शिधा दिला जाईल.
दिवाळीचा विचार केला असता नाशिक जिल्ह्यात त्यावेळी सात लाख 93 हजार 591 कुटुंबांना या आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले होते. याही वेळी नाशिक जिल्ह्यात तेवढेच लाभार्थी राहणार आहेत. निश्चितच यामुळे जिल्ह्यातील संबंधित लाभार्थ्यांच्या घरात सणं गोड होणार आहे.
हे पण वाचा :- Solapur News : सोलापूर अन पुणेकरांना लवकरच मिळणार आणखी एक वंदे भारतची भेट ! असा राहील रूट, वाचा डिटेल्स