Kanda Chal Anudan Maharashtra : राज्यात शेतकरी बांधव कांदा या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करतात. कॅश क्रॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पिकाच्या शेतीतून शेतकऱ्यांना अनेकदा मात्र अपेक्षित अशी कमाई होत नाही.
याचे प्रमुख कारण म्हणजे कांद्याला अनेकदा भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव कांद्याची साठवणूक करण्यावर अधिक भर देतात. रब्बी हंगामातील कांदा शेतकरी मोठ्या प्रमाणात साठवतात. कांदा साठवण्यासाठी शेतकरी कांदा चाळीची उभारणी करत असतात.
विशेष म्हणजे कांदा उत्पादकांच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हावी म्हणून राज्य शासनाकडून कांदा चाळ उभारणीसाठी अनुदान देखील दिले जाते. अशा परिस्थितीत आज आपण कांदा चाळ अनुदान योजने संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- अहमदनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी; आता नगरमध्ये आणखी एक उड्डाणपुल तयार होणार, ‘या’ ठिकाणी बनवला जाणार नवीन फ्लायओव्हर, पहा….
कांदा चाळ अनुदान योजनेचे स्वरूप?
राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून कांदा चाळ अनुदान योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून कांदा उत्पादकांना कांदा चाळ क्षमतेनुसार अनुदान वितरित केले जाते.
या योजनेनुसार, ५, १०, १५, २० व २५ मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीच्या उभारणीसाठी अनुदान मिळते. या क्षमतेच्या चाळी उभारण्यासाठी जो खर्च येतो त्याचे ५०% अनुदान मिळते. कमाल ३,५०० रु. प्रति मेट्रिक टन इतकं अनुदान आर्थिक सहाय्य म्हणून शासनाकडून पुरवले जाते.कांदा चाळ
हे पण वाचा :- विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! दहावी-बारावीच्या निकालाची तारीख झाली फिक्स; बोर्डाने दिली मोठी माहिती, वाचा….
अनुदान योजनेसाठी आवश्यक पात्रता?
या योजनेचा लाभ केवळ शेतकऱ्यांना दिला जातो म्हणजेच ज्याच्या नावावर जमीन आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो.
यासोबतच, हे अनुदान फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाच मिळते. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पिक पेऱ्यावर कांदा पिकाची नोंद केली आहे अशाच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो.
यासाठी सातबारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद आवश्यक असते.
कांदा चाळ अनुदान योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचा गट किंवा स्वयंसहाय्यता गट, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, शेतकऱ्यांचा उत्पादक संघ, सहकारी संघ तसेच नोंदणीकृत शेती संबंधित संस्था इ. लोकांना आणि संस्थांना मिळतो.
हे पण वाचा :- Soybean Farming Information : सोयाबीन उत्पादक शेतकरी इकडे लक्ष द्या ! कृषी विभागाकडून महत्वाचा अलर्ट…
कांदा चाळ अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
इतर कोणत्याही शासकीय योजनेप्रमाणेच या योजनेचा लाभ घेताना देखील शेतकऱ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा, आरक्षित प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी जातीचा दाखला आणि हमीपत्र देखील जोडावे लागते.
अर्ज कुठे करावा लागणार?
http://www.hortnet.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन महाराष्ट्रातील इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांना कांदा चाळ अनुदानासाठी अर्ज करता येणार आहे. संकेतस्थळावर अर्ज सादर केल्यानंतर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिली जाते.
पूर्वसंमती मिळाल्यानंतर मग शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणी करावी लागते. त्यासाठी शासनाच्या निकषाचे पालन आवश्यक आहे. कांदा चाळ उभारल्यानंतर मग तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी सहाय्यक यांना लेखी स्वरूपात कांदा चाळ उभारणी झाली असल्याचे कळवावे लागते.
हे पण वाचा :- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग झाला मोकळा! सीएसएमटी-मडगाव Vande Bharat Train ट्रायल रनसाठी सुसाट, केव्हा धावणार? पहा…