Mumbai Goa Vande Bharat Train : मार्च 2023 मध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई-गोवा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान आता या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावण्यासाठी सज्ज होत आहे.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी आवश्यक ट्रायल रन सुरू झाले आहेत.
यासाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास निघालेली वंदे भारत एक्सप्रेस रत्नागिरी रेल्वे स्थानकावर साडेदहा वाजता पोहोचली आणि तेथून पुढे मडगाव रेल्वे स्टेशन कडे रवाना झाली आहे.
हे पण वाचा :- सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाची बातमी; यंदा सोयाबीनचे घरचे बियाणे वापरताना ‘ही’ काळजी घ्या, वाचा
मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावर ही ट्रेन सुरू करण्यासाठी दोन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. रूट ट्रायल आणि स्पीड ट्रायल अशा दोन चाचण्या राहणार आहेत.
दरम्यान रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मार्गावरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सीएसएमटी ते मडगाव अर्थातच मुंबई ते गोवा वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे.
अशातच या मार्गावर सध्या सुरू असलेली तेजस एक्सप्रेस वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर बंद होईल का? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र आतापर्यंत ज्या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू झाली आहे तेथील पूर्वी सुरू असलेली कोणतीच गाडी बंद करण्यात आलेली नाही.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! पुणे रेल्वे स्थानकावरून ‘या’ शहरादरम्यान सुरू झाली सुपरफास्ट ट्रेन; ‘या’ लोकांना होणार फायदा, पहा…
यामुळे यादेखील मार्गावर आधीची तेजस एक्सप्रेस पूर्वलक्षी प्रभावाने सुरू राहील अशी आशा व्यक्त होत आहे. दरम्यान या मार्गावर रूट ट्रायल आणि स्पीड ट्रायल असे दोन ट्रायल घेतले जाणार असल्याने आणखी एक दिवस ट्रायल रन घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
एकंदरीत या मार्गावरील ट्रायल रन यशस्वी झाल्यानंतर या मार्गावर ही संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत ट्रेन धावू शकणार असल्याचे चित्र तयार होत आहे. दरम्यान ही मुंबई ते मडगाव दरम्यान धावणारी ट्रेन केव्हा सुरू होईल? याबाबत अधिकृत माहिती भारतीय रेल्वेच्या माध्यमातून समोर आलेली नाही.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सफरचंदाच्या नवीन जाती विकसित, आता दुष्काळी माळरानावर देखील सफरचंद लागवड करता येणार, पहा…