Job Alert : महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. पुणे महापालिकेत वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. महापालिकेत तब्बल 320 पदांसाठी सरळसेवा प्रवेशाने पदभरती केली जाणार आहे.
यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली असून वर्ग एक, वर्ग दोन आणि वर्ग तीन ची पदे भरली जाणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या पदभरती अंतर्गत आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन या विभागातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. या आधी देखील पुणे महापालिकेच्या माध्यमातून रिक्त पदाची भरती झाली होती.
आता पुन्हा एकदा रिक्त पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली असून हा भरतीचा दुसरा टप्पा आहे. यासाठी नुकतेच अधिसूचना काढण्यात आली असून आठ मार्च 2023 पासून या पदभरतीसाठी अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आता अर्ज करायला काही हरकत नाही.
अर्ज 28 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. अर्ज करण्यासाठी पुणे महापालिकेच्या https://pmc.gov.in/mr/recruitments या अधिकृत संकेतस्थळावर मात्र उमेदवारांना भेट द्यावी लागणार आहे.
हे पण वाचा :- Mumbai Job : मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी ! महापालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती; असा करा अर्ज
कोणत्या पदासाठी होणार भरती
- क्ष-किरण तज्ज्ञ (रेडिओलॉजिस्ट,सोनोलॉजिस्ट) (८ पदे)
- वैद्यकीय अधिकारी,निवासी वैद्यकीय अधिकारी (२० पदे)
- उपसंचालक (प्राणी संग्रहालय) (१ पद)
- पशुवैद्यकीय अधिकारी (२ पदे)
- वरिष्ठ आरोग्य निरीक्षक,सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर,विभागीय आरोग्य निरीक्षक (२० पदे)
- कनिष्ठ अभियंता (विद्युत) (१० पदे)
- आरोग्य निरीक्षक,सॅनिटरी इन्स्पेक्टर (४० पदे)
- वाहन निरीक्षक,व्हेईकल इन्स्पेक्टर (३ पदे)
- औषध निर्माता (१५ पदे)
- पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) (१ पद)
- अग्निशामक विमोचक,फायरमन (२०० पदे)
वर नमूद करण्यात आलेल्या पदांसाठी पात्राने इच्छुक उमेदवारांनी 28 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पदभरती अंतर्गत सर्वसामान्य प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये परीक्षा फी लागणार आहे.
हे पण वाचा :- 10वी पास तरुणांना पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ सरकारी विभागात आजच करा अर्ज; 50 हजारापर्यंत मिळणार पगार