Mumbai Job : मुंबईत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महापालिकेत एक मोठी भरती निघाली आहे. तब्बल 652 रिक्त पदांच्या भरतीसाठी महापालिकेच्या माध्यमातून अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. परिचारिका या रिक्त पदांसाठी अर्ज मागवले जात असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे.
आठ मार्चपासून या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून विहित कालावधीमध्ये ईच्छुक आणि केवळ पात्र उमेदवारांनाच अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या अन किती पदांसाठी होणार भरती?
मुंबई महानगरपालिका अंतर्गत परिचारिका या पदाच्या एकूण 652 रिक्त पदांसाठी अधिसूचना काढण्यात आली आहे.
अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक
यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून अर्ज हा 21 मार्च 2023 पर्यंत इच्छुक उमेदवारांना पाठवावा लागणार आहे.
हे पण वाचा :- राज्य शासनाने म्हाडाच्या ‘त्या’ घराबद्दल घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! फडणवीस यांनी दिली विधिमंडळात माहिती
अर्ज कसा पाठवायचा
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय, वार्ड नंबर सात प्रशिक्षण कार्यालय, मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी पश्चिम 400011 या पत्त्यावर आपला अर्ज आवश्यक कागदपत्रांसहित सादर करायचा आहे.
किती मिळणार वेतन
परिचारिका या पदासाठी 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार 400 इतकं वेतनमान राहणार आहे.
या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या लिंकवर क्लिक करा.
हे पण वाचा :- खुशखबर ! ‘या’ उच्च न्यायालयात निघाली मोठी भरती; पदवीधर उमेदवारांना आहे मोठा चॅन्स, वाचा सविस्तर