Indian Railway Minister Announced New Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस म्हटल म्हणजे आलिशान, गतिमान आणि आरामदायी प्रवास. म्हणूनच की काय आता देशभरात या ट्रेनची चर्चा रंगली आहे. साहजिकच या ट्रेनचे तिकीट दर इतर एक्सप्रेसच्या तुलनेत अधिक आहेत मात्र तरीही कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, या उक्तीप्रमाणे या ट्रेनला अल्पावधीतच प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दाखवला आहे.
हेच कारण आहे की आता वेगवेगळ्या रूट वर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा मानस भारतीय रेल्वेचा आहे. ट्रेनची लोकप्रियता पाहता शासनाकडूनही लवकरात लवकर देशभरातील सर्व महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता या कामाला अधिक गती दिली जात आहे. सध्या देशभरात एकूण दहा वंदे भारत एक्सप्रेस कार्यरत आहेत.
हे पण वाचा :- आताची सर्वात मोठी बातमी! ‘या’ महिन्यात मिळणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता; ‘या’ आहेत अटी, वाचा….
यामध्ये आपल्या महाराष्ट्रात एकूण चार वंदे भारत एक्सप्रेस आहेत. दरम्यान आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच आता देशातील सर्वाधिक उंचीच्या पुलावर वंदे भारत एक्सप्रेस गाडी सुरू होणार आहे. रविवारी अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात घोषणा केली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे जोड प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर या रूटवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे.
म्हणजे आता या रूट वरील जगातील सर्वाधिक उंचीचा पूल म्हणजेच चिनाबं पुलवर आता ही ट्रेन धावणार आहे. वैष्णव यांनी सांगितल्याप्रमाणे हा प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाला की यावर लगेचच वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा मानस आहे. यासोबतच काश्मीर खोऱ्यातील बडगाम जिल्ह्यात देखभाल सुविधा उभारण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
हे पण वाचा :- पुणे-सिकंदराबाद दरम्यान आता शताब्दी ऐवजी वंदे भारत एक्सप्रेस धावणार? समोर आली तिकीट दराबाबत मोठी माहिती, पहा…..
निश्चितच या प्रकल्पामुळे जम्मू-काश्मीरमध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. तेथील नवयुक्त तरुणांच्या हाताला यामुळे काम मिळेल आणि काश्मीर खोऱ्याचा विकास सुनिश्चित होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. यासोबतच वंदे भारत मेट्रो देखील शहराअंतर्गत सुरू होणार आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पानंतर जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत मेट्रो सुरू करण्याचा मानस शासनाचा असल्याचे यावेळी मंत्रिमहोदयांनी स्पष्ट केले आहे.
निश्चितच वंदे भारत एक्सप्रेस वेगवेगळ्या रूटवर सुरू करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून उदमपूर श्रीनगर बारामुल्ला या रेल्वे मार्गावर ही ट्रेन लवकरच कार्यान्वित करण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून सध्या स्थितीला जोमात काम सुरू आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! कोल्हापूर ते मुंबई दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस? केंद्रीय मंत्री सिंधीया करणार पाठपुरावा