Home Loan : आपला हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र वाढती महागाई या स्वप्नाच्या आड येत आहे. दिवसेंदिवस महागाई आकाशाला गवसणी घालत आहे यामुळे घर घेणेदेखील महाग झाला आहे. परिणामी आपल्यापैकी अनेक जण गृह कर्जाचा पर्याय निवडतात. एक उत्तम पर्याय असून यामुळे आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात खरं उतरत. मात्र गृह कर्ज घेताना बँकांकडून आकारला जाणारा व्याजदर सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय असतो.
अशातच मात्र बँक ऑफ बडोदा ने होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. या सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी गृह कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात केली आहे. यामुळे बँक ऑफ बडोदाकडून गृह कर्ज घेऊन सर्वसामान्य व्यक्ती आपल्या स्वप्नातील घर निर्मितीचा विचार नक्कीच करू शकणार आहे. वास्तविक इतर बँका गृह कर्जाचे व्याजदर वाढवत आहेत मात्र बँक ऑफ बडोदाने गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहे.
वास्तविक रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून रेपो रेट मध्ये मोठी वाढ गेल्या काही वर्षांमध्ये झाली आहे. साहजिक रेपो रेट वाढला म्हणजेच व्याजदरात वाढ ही होतच असते. यामुळे अनेक बँकांनी आपले गृहकर्जावरील व्याजदर देखील वाढवले आहेत. परंतु बँक ऑफ बडोदा ने या व्याजदरात कटोती केली आहे.
मात्र ही कटोती काही ठराविक कालावधीसाठीच आहे यामुळे ज्या व्यक्तींना गृह कर्ज घ्यायचे असेल त्यांनी ताबडतोब गृह कर्ज या बँकेतून घेणे आवश्यक राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रविवारी अर्थातच पाच मार्च रोजी बँक ऑफ बडोदा ने एक घोषणा करत गृह कर्जावरील व्याजदर तसेच एमएसएमईवरील व्याजदर कपात केली आहे.
हे पण वाचा :- Shirdi News : काय सांगता….! मुंबई-सोलापूर अन मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन बंद होणार का?
बँकेकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, गृहकर्तावरील व्याजदर 40 बेसिस पॉईंट अर्थातच 0.40 टक्क्यांनी कमी झाला आहे. म्हणजेच आता 8.5% इतकां गृहकजावरील व्याजदर राहणार आहे. सोबतच एमएसएमई कर्जासाठी 8.4% एवढा व्याजदर आकारला जाणार आहे. याव्यतिरिक्त या बँकेच्या माध्यमातून भक्तासाठी आवश्यक असणारी प्रोसेसिंग फी 100% सूट करण्यात आली आहे. एवढेच नाही तर एमएसएमई कर्जासाठी देखील 50% एवढी प्रोसेसिंग फी सूट बँकेच्या माध्यमातून दिली जात आहे.
मात्र हे कमी केलेले दर 5 मार्च 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीपर्यंतच कमी राहतील. म्हणजेच यानंतर पुन्हा या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. निश्चितच बँक ऑफ बडोदा ने घेतलेला हा निर्णय सर्वसामान्यांसाठी अतिशय फायदेशीर राहणार असून ज्या लोकांना घर बांधायचं आहे अशा लोकांनी लवकरात लवकर या बँके अंतर्गत कर्जासाठी अर्ज करायला काही हरकत नाही.
हे पण वाचा :- गृह कर्ज घेण्याचा विचार करताय का? मग ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा, बँक कोणतीही असो डॉक्युमेंट सारखेच लागतील, वाचा डिटेल्स