Home Loan Tips : प्रत्येकाचे स्वतःचे हक्काचे घर असावं हे स्वप्न असतं. तुम्हीही हे स्वप्न पाहिलंच असेल. जर तुम्हाला आपला हक्काचं स्वप्नाचं घर बनवायचं असेल आणि तुम्ही यासाठी गृह कर्ज अर्थातच होम लोन घेऊ इच्छित असाल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी. आज आपण गृह कर्ज घेताना कोणत्या बाबींची काळजी घेतली पाहिजे, तसेच गृह कर्ज घेताना कोणती गोष्ट परिणामकारक ठरते याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
खरं पाहता अलीकडे बँका गृह कर्ज देण्यासाठी पुढे सरसावत आहेत. बँकांच्या माध्यमातून आकर्षक ऑफर्स लावून नागरिकांना गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या देशातील अग्रगण्य बँका सर्वसामान्य लोकांना होम लोन उपलब्ध करून देतात. पण होम लोन घेताना महत्वाच्या अशा तीन गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. चला तर मग जाणून घेऊया त्या तीन गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत.
क्रेडिट स्कोर चांगला असला पाहिजे?
जसं की आपणास ठाऊकच आहे की, कर्ज घेण्यासाठी बँकांकडून क्रेडिट स्कोर अर्थातच सिबिल स्कोर ची विचारपूस केली जाते. सिबिल स्कोर हा जर चांगला राहिला तर बँका लवकर कर्ज उपलब्ध करून देतात. मात्र जर सिबिल स्कोर खराब असेल तर बँका कर्ज नाकारतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर माहिती नसेल तर आपण cibil.com या वेबसाईटवर जाऊन आपला सिबिल स्कोर चेक करू शकणार आहात.
सिबिल स्कोर चेक केल्यानंतर जर आपला सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असेल तर आपल्याला कोणतीही बँक सहजतेने कर्ज उपलब्ध करून देईल. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की सिबिल स्कोर हा कर्ज तर उपलब्ध करून देतोच शिवाय जेवढा चांगला सिबिल स्कोर असतो तेवढेच व्याजदर देखील कमी आकारले जाते. यामुळे जर तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल तर तुमचा सिबिल स्कोर चांगला करण्यासाठी तुम्ही काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत.
जसे की जर तुम्ही आधीच एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाची परतफेड वेळेत आणि विहित कालावधीमध्ये करणे गरजेचे आहे. यासोबतच क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डचा भरणा वेळेवर झाला पाहिजे. तसेच क्रेडिट कार्ड ची संपूर्ण लिमिट वापरू नका. या अशा चुका टाळून आपण आपला सिबिल स्कोर निश्चितच वाढवू शकणार आहेत.
हे पण वाचा :- पुणे-मुंबई मिसिंग लींक : मोठी बातमी! ‘या’ महिन्यात होणार काम पूर्ण; एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती
डाऊन पेमेंट अधिक करा
सिबिल सोबतच डाऊन पेमेंट देखील कर्ज मंजूर करण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावत असते. म्हणजे जर तुम्हाला कर्ज मंजुरीची शक्यता वाढवायची असेल तर आपण अधिक डाऊन पेमेंट करू शकतात. याशिवाय जास्त डाऊन पेमेंट केल्याने क्रेडिट ची जोखीम म्हणजेच रिस्क देखील कमी होते. याशिवाय यामुळे गृह कर्जावर व्याजदर देखील कमी लागतो. यामुळे याही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.
किती काळ कर्ज घ्यावे
खरं पाहता होम लोन साठी संबंधित कर्जदार व्यक्ती किती कालावधीमध्ये कर्ज परतफेड करू शकतो याची देखील चाचणी संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाते. सोबतच कर्ज परतफेडीची क्षमता देखील अधिकाऱ्याच्या माध्यमातून तपासली जाते. यामुळे तुम्ही नियमितपणे किती ईएमआय भरू शकता यानुसारच तुमच्या कर्ज परतफेडीचा कालावधी ठरवला गेला पाहिजे. तसेच गृह कर्ज घेताना देखील या बाबीची काळजी घेऊन जेवढं तुम्हाला अपेक्षित आणि आवश्यक आहे तेवढेच गृह कर्ज देखील घेतलं पाहिजे.