Pune News : गेल्या महिन्यात मध्य रेल्वेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. अशातच आता महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. दक्षिण रेल्वे विभाग लवकरच सिकंदराबाद-पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे.
खरं पाहता, दक्षिण रेल्वे विभागाने या वंदे भारत एक्सप्रेसची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी केली आहे. अशातच आता ही वंदे भारत एक्सप्रेस मार्च अखेर सुरू करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर मार्गे धावणार असल्याने पुणे आणि सोलापूर वासियांना हैदराबाद कडील प्रवास सोयीचा होणार आहे.
अशातच आता सिकंदराबाद-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा वेळापत्रक कसा राहील, तिकिटाचे दर कसे असतील, या ट्रेनला कुठे कुठे थांबा दिला जाईल, यांसारख्या बाबी जाणून घेण्यासाठी प्रवाशांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
हे पण वाचा :- पुणे-मुंबई मिसिंग लींक : मोठी बातमी! ‘या’ महिन्यात होणार काम पूर्ण; एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती
वास्तविक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे पुणे आणि सोलापूर वासियांना मोठा फायदा होत आहे. सोलापूर वासियांना या ट्रेनमुळे पुण्याकडचा प्रवास आधीच सोयीचा झाला आहे. अशातच आता सिकंदराबाद पुणे दरम्यान देखील वंदे भारत ट्रेन धावणार आहे यामुळे या ट्रेनमुळे देखील सोलापूर वासियांना पुणे आणि हैदराबाद कडील प्रवास सोयीचा होणार आहे.
ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असून आपल्या गतिमान प्रवासासाठी ओळखली जात आहे. त्यामुळे आता सिकंदराबाद आणि पुण्यादरम्यानचा प्रवास देखील गतिमान होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला पुणे ते हैदराबाद दरम्यान प्रवास करण्यासाठी शताब्दी एक्सप्रेस उपलब्ध आहे. शताब्दी एक्सप्रेसला मात्र या दोन शहरांदरम्यान प्रवासासाठी आठ तास वीस मिनिटांचा कालावधी लागतो.
म्हणजे या शताब्दी एक्सप्रेसने या दोन शहरा दरम्यान असलेलं 600 किलोमीटरच अंतर कापण्यासाठी निश्चितच अधिक कालावधी प्रवाशांना खर्च करावा लागत आहे. यामुळे या रूटवर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर निश्चितच प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. खरं पाहता, सध्या सुरू असलेल्या शताब्दी एक्सप्रेसला पुण्यानंतर सोलापूर, कलबुर्गी, वाडी, तांडूर, सिकंदराबाद तसेच बेगम पेठ या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.
यामुळे आता वंदे भारत एक्सप्रेस ला नेमके याच ठिकाणी थांबे मिळतील का? थांबे वाढवले जातील की कमी केले जातील? याबाबत देखील प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे. वास्तविक दक्षिण रेल्वे विभागाकडून सध्या सुरू असलेली सिकंदराबाद पुणे दरम्यानची शताब्दी एक्सप्रेस मध्ये होणारी गर्दी पाहता वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे विभागाचा हा निर्णय प्रवाशांसाठी सोयीचा राहणार असून या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत केले जात आहे. दरम्यान एका मीडिया रिपोर्ट मध्ये या ट्रेन बाबत अधिक माहिती देताना असं सांगितलं गेलं आहे की ही मार्च अखेर सुरू होणारी वंदे भारत गाडी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून निघून तांडूर मार्गे वाडी, कुलबुर्गी, सोलापूर तसेच पुण्याकडे रवाना होणार आहे.
तसेच ही गाडी पुन्हा पुण्याहून सोलापूर मार्गे सिकंदराबादकडे रवाना होईल. अर्थातच सोलापूर वासियांना आता पुणे आणि हैदराबादचा प्रवास एक दिवसात करता येणे शक्य होईल असा दावा केला जात आहे. एकंदरीत या चालू वर्षात देशभरात नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. शिवाय पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुका देखील राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून सध्या विकासाची कामे करण्यावर अधिक भर दिला जात आहे. हेच कारण आहे की, वंदे भारत ट्रेन देखील लवकरात लवकर वेगवेगळ्या रूटवर सुरू करण्याचे नियोजन शासनाने आखले आहे.
याच नियोजनाच्या माध्यमातून दक्षिण रेल्वे विभागाच्या अंतर्गत दक्षिण रेल्वे विभागाकडून सिकंदराबाद पुणे वंदे भारत एक्सप्रेस ला मार्च अखेर हिरवा झेंडा दाखवला जाऊ शकतो असं सांगितलं जात आहे. या संदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून संकेत देखील दिले जात आहेत. आता प्रवाशांना सिकंदराबाद-पुणे वंदे भारत एक्सप्रेसची चाहूल लागली असून या वंदे भारती ट्रेनच्या उद्घाटनाची औपचारिक तारीख नेमकी केव्हा समोर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! नासिक-पुणे रेल्वेसाठी दिलेली स्थगिती नजरचुक, महारेलचा दावा; आता सुरू होणार का भूसंपादन, वाचा?