Home Loan : अनेकांना घर बांधण्यासाठी गृह कर्ज घ्यायचे असते मात्र कोणत्या बँकां स्वस्तात गृह कर्ज उपलब्ध करून देतात याबाबत त्यांना माहिती नसते. अशा परिस्थितीत अशा लोकांसाठी आजचा हा लेख विशेष फायदेशीर राहणार आहे.
ज्या लोकांना गृह कर्ज अपेक्षित आहे त्यांच्यासाठी आज आम्ही कोणत्या बँका स्वस्तात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत याविषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
हे पण वाचा :- होळीच्या सणाला ‘या’ बँकेने दिली गोड बातमी; गृहकर्जावरील व्याजदरात केली मोठी कपात, आता घर घेणं होणार सोपं
- आम्ही आपणास सांगू इच्छितो की, GIC हाउसिंग फायनान्स ही फायनान्स कंपनी किंवा वित्तीय संस्था गृह कर्जावर सर्वात कमी व्याजदर आकारात आहे. ही बँक गृह कर्जावर 8.10% इतके व्याजदर आकारात आहे. इतर बँकांच्या तुलनेत GIC हाऊसिंग फायनान्स चा हा व्याजदर खूपच कमी आहे.
- याशिवाय एचडीएफसी बँक देखील कमी व्याज दरात गृह कर्ज उपलब्ध करून देते. एचडीएफसी सध्या 8.45% इतके व्याजदर गृहकर्जावर आकारत आहे. यामुळे ज्या व्यक्तींना कमी व्याज दरात गृह कर्ज अपेक्षित असेल ते एचडीएफसी बँकेचा विचार करू शकतात.
हे पण वाचा :- गृह कर्ज घेण्याचा विचार करताय का? मग ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा, बँक कोणतीही असो डॉक्युमेंट सारखेच लागतील, वाचा डिटेल्स
- यासह पंजाब नॅशनल बँक हाउसिंग फायनान्स देखील 8.5% दरावर गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. ही एक सरकारी मालकीची वित्तीय संस्था आहे.
- याशिवाय सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँक गृहकर्जावर 8.55% इतके व्याजदर आकारात आहे.
- यासोबतच बँक ऑफ महाराष्ट्र ही एक सरकारी बँक गृहकर्जासाठी 8.6% इतके व्याजदर घेते.
- तसेच युनियन बँक ऑफ इंडिया देखील गृहकर्जावर 8.6% इतकच व्याजदर आकारते.
- इंडियन ओव्हरसीज बँकही 8.6% इतकं व्याजदर Home Loan साठी आकारत आहे.
- बजाज फिनसर्व्ह ही देखील 8.6% इतके व्याजदर Home loan वर आकारते.
- कोटक महिंद्रा बँक ही 8.65% इतके व्याजदर गृहकर्जावर आकारते.
- सरकारी मालकीची एलआयसी हाऊसिंग फायनान्स ही वित्तीय संस्था गृहकर्जावर 8.6% इतके व्याज दर आकारते.
- आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स ही बँक गृहकर्जावर 8.75 टक्के इतके व्याजदर आकारते.
हे पण वाचा :- होमलोन घेण्याचा विचार करताय? मग, एचडीएफसी देतय तुम्हाला झटपट गृहकर्ज; अर्ज करण्याची पद्धत, पात्रता वाचा