Farming News : बाजरी पिकाची आपल्या देशात सर्वाधिक लागवड होते. बाजरीच्या एकूण जागतिक उत्पादनात भारताचा जवळपास 42 टक्के वाटा आहे. म्हणजे जवळपास बाजरीचे निम्मे उत्पादन हे आपल्या देशातच होते.
साहजिकच याची लागवड देशभरात केली जाते. राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यात मात्र बाजरीची सर्वाधिक लागवड पाहायला मिळते. आपल्या महाराष्ट्रात देखील या पिकाची शेती केली जाते. खरीप हंगामात देखील बाजरीची लागवड विशेष उल्लेखनीय आहे.
खरं पाहता कोणत्याही पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी त्या पिकाच्या सुधारित जातीची शेती करण्याचा सल्ला दिला जातो. बाजरीच्याही वेगवेगळ्या जातींची लागवड शेतकरी करत असतात.
दरम्यान आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी बाजरीच्या एका सुधारित वाणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण सादा गोल्ड या तुर्की मधील बाजरी वाणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- मराठवाड्यातील शेतकऱ्याचा सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी; 2 एकरात मिळवले 4 लाखाचे उत्पन्न, वाचा ही यशोगाथा
सादा गोल्ड बाजरीच्या वाणाची विशेषता खालीलप्रमाणे
बाजरीच्या सादा गोल्ड ही जात कमी पाण्यात जास्त उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो.
या बाजरीच्या वाणाच्या शेतीसाठी खर्च खूपच कमी आहे.
बाजरीच्या या जातीची लांबी देशी बाजरीच्या जातींपेक्षा जास्त आहे.
या जातींचे बाजरीचे पीक 8 ते 10 फूट उंच वाढते तर याचे कणीस हे जवळपास चार फूट लांबीचे असते.
काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड केली असून त्यांच्या मते या जातीपासून एकरी 16 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. या जातीपासून याहीपेक्षा अधिक उत्पादन मिळवता येणे शक्य असल्याचे देखील शेतकऱ्यांनी नमूद केले आहे.
विशेष म्हणजे बाजरीच्या इतर देशी जातींपासून एकरी आठ क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. यामुळे हे तुर्की मधील बाजरीचे वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी; कापसाच्या ‘या’ वाणाची लागवड करा, 30 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवा
या शेतकऱ्याने करून दाखवली यशस्वी लागवड
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजस्थान मधील एका शेतकऱ्याने या जातीच्या बाजरीची यशस्वी शेती केली आहे. राजस्थान मधील भरतपूर जिल्ह्यातील पिपला या गावातील रहिवासी शेतकरी दिनेश टेंगुरिया याने या बाजरीची यशस्वी शेती करून दाखवली आहे.
विशेष बाब म्हणजे या शेतकऱ्याने या जातीच्या बाजरीचे बियाणे तुर्कि येथून मागवले होते. त्याने आपल्या चार एकर जमिनीवर या वाणाची लागवड केली होती मात्र यापैकी दोन एकर जमिनीवरील पीक अतिवृष्टीमुळे नेस्तनाभूत झाले होते.
दिनेश यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना चार एकर जमिनीवर 20 kg बाजरी बियाण्याची गरज भासली होती. यासाठी त्यांना 50000 पर्यंतचा खर्च आला होता.