शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एप्लीकेशनच्या मदतीने सर्व अडचणी होणार दूर; हवामान अंदाज, कृषी तज्ञांचा सल्ला, सरकारी योजनांची माहिती आता एका क्लिकवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farming News : हवामानाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना कोणत्याच पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही.

शेतकऱ्यांना हवामानाची माहिती, सरकारी योजनांची माहिती वेळेत मिळत नसल्याने तसेच तज्ञ लोकांचा सल्ला वेळेवर मिळत नसल्याने पीक उत्पादनात प्रामुख्याने घट होत आहे.

दरम्यान शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातील तीन शेतकरी पुत्रांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एका भन्नाट ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे.

या ॲप्लिकेशनच्या मदतीने शेतकऱ्यांना कोणत्याही हंगामातील पिकांविषयीची अडचण, तज्ञ लोकांचे मार्गदर्शन आणि सल्ला, चार दिवसांचा हवामान अंदाज, पिकांच्या सद्यस्थितीनुसार तज्ज्ञ आणि अनुभवी लोकांचे ऑनलाईन मार्गदर्शन, सरकारी योजनांबद्दल माहिती, सर्व पिकांच्या रोगांविषयी माहिती आणि व्हिडिओद्वारे मोफत सल्ला, सर्व प्रकारच्या औषधांची माहिती, जवळील विश्वासू कृषी सेवा केंद्रांची माहिती मिळणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! यंदा कापूस लागवड करतांना ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर….

परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादनात वाढ होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नाशिक जिल्ह्यातील सुनील दिंडे, सागर पवार, प्रशांत दिंडे या तिन्ही शेतकरी पत्रांनी डॉक्टर किसान अँप नावाचे एक एप्लीकेशन विकसित केले आहे.

याच्या मदतीने आता शेतकऱ्यांना शेतीसंबंधी शेतीविषयक सर्वच माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन मोफत मिळवता येईल. तसेच सर्व पिकांच्या रोगांविषयी माहिती मिळणार आहे.

शेतकऱ्यांना पिकांच्या रोगाविषयी माहिती मिळाली तर त्याचे निदान करणे सोपे होणार आहे तसेच रोगाचे निदान करण्यासाठी तज्ञ लोकांचा सल्ला देखील या ऍप्लिकेशनवर मोफत मिळणार आहे. एवढेच नाहीतर सर्व सरकारी योजनांबद्दल अद्ययावत माहिती आणि सर्व प्रकारच्या औषधांची माहिती देखील शेतकऱ्यांना मिळवता येणार आहे.

हे पण वाचा :- यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या ‘या’ महाराष्ट्रासाठी शिफारसीत जातीची पेरणी करा, अधिकचे उत्पादन मिळवा

कुठं डाउनलोड करणार हे अँप्लिकेशन

हे एप्लीकेशन शेतकऱ्यांचा हितासाठी प्ले स्टोर वर मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपण डॉक्टर किसान ॲप असं प्ले स्टोअर वर सर्च केलं की हे ॲप्लिकेशन आपल्याला मिळून जाईल. किंवा आपण https://play.google.com/store/apps/details?id=doctorkisan.app या लिंकवर क्लिक करून हे एप्लीकेशन मोफत डाऊनलोड करू शकता. एप्लीकेशन ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे मराठी भाषेत वापरता येते. परिणामी मराठी भाषिक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारच्या ‘या’ एका निर्णयामुळे उन्हाळी कांदा दरात होणार मोठी वाढ, वाचा….

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा