Cotton Market : व्हाईट गोल्ड म्हणजेच पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसा संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. ती म्हणजे काल अर्थातच 15 जून 2023 रोजी वायद्यामध्ये कापूस दरात सुधारणा झाली. यामुळे हंगामाच्या शेवटी कापूस उत्पादकांचे तोंड गोड होणार असे चित्र तयार होत आहे.
खरंतर कापूस हे राज्यातील एक मुख्य पीक असून या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. राज्यातील खानदेश, मराठवाडा, विदर्भ या विभागातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मदार हा कापूस या नगदी पिकावर असल्याचे पाहायला मिळते.
या विभागातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण या नगदी पिकावर आधारित आहे. शिवाय गेल्या हंगामात कापसाला चांगला भाव मिळाला होता म्हणून या चालू हंगामात कापूस लागवड वाढली होती. मात्र आता हंगाम संपण्याच्या टप्प्यात आला आहे. नवीन हंगामासाठी कापूस लागवड सुरू देखील झाली आहे. काही भागात पूर्व मौसमी कापूस लागवड शेतकऱ्यांनी केली असून काही ठिकाणी कापूस पिक पेरणीसाठी तयारी सुरू झाली आहे.
मात्र तरीही या हंगामात कापूस दर दबावातच आहेत. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधव बुचकळ्यात सापडले आहेत. दरम्यान आज देशातील वायद्यामध्ये कापूस दर वधारले आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात घसरण झाल्याचे नमूद करण्यात आले. तसेच वायद्यांमध्ये दरात सुधारणा झाली असली तरी देखील प्रत्यक्ष बाजार समितीमध्ये याचा काहीच परिणाम पाहायला मिळाला नाही.
देशातील बाजारामध्ये आजही कापूस 7000 ते 7400 रुपये प्रतिक्विंटल या दरातच विकला गेला आहे. खरंतर दरवर्षी जून महिन्यात 14 हजार ते 15,000 गाठी रोजाना आवक होत असते. यंदा मात्र जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच 50 हजार ते 55 हजार कापूसगाठीची रोजाना आवक होत आहे. अर्थातच सरासरी आवकेचा विचार केला असता यंदा जून महिन्यात अधिक आवक पाहायला मिळत आहे. हेच कारण आहे की, कापसाच्या दरात दबाव असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक जून महिन्यात कापूस कमी राहतो म्हणून चांगला दर कापसाला मिळतो.
हे पण वाचा :- आज राज्यात उष्णतेची लाट येणार ! पण ‘त्या’ 7 जिल्ह्यात होणार वादळी पाऊस, हवामान विभागाची माहिती
यंदा मात्र परिस्थिती भिन्न आहे आवक अधिक असल्याने दरात घसरण झाली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आणि काही जाणकार लोकांनी शेतकऱ्यांकडे किती कापूसं शिल्लक आहे याबाबत असलेली संभ्रमाअवस्था पाहता जाणूनबुजून व्यापाऱ्यांच्या माध्यमातून दरावर दबाव तयार केला गेला असल्याचे मत यावेळी व्यक्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल 15 जून रोजी एमसीएक्सवर कापसाचे वायदे ५२० रुपयांनी वाढून ५९ हजार रुपये प्रतिखंडीवर पोचले होते.
विशेष म्हणजे चार ते पाच दिवस कापसाच्या वायद्यात सातत्याने घसरण होत होती मात्र काल वाढ झाली आहे. बाजार समित्यांमध्ये मात्र दर स्थिर होते. 7000 ते 7400 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव बाजार समित्यांमध्ये नमूद करण्यात आला. दरावर दबाव असला तरी देखील आवक मात्र कायम आहे. दरम्यान आता भविष्यात, नवीन हंगामात कापसाला काय भाव मिळतो हे सर्वस्वी कापूस लागवडीखालील क्षेत्र, मान्सून कसा राहतो, हवामान कसे राहतं, किती उत्पादन होतं यावरच अवलंबून राहणार आहे.
हे पण वाचा :- हळद लागवड करताय? मग हळदीच्या सुधारित जाती आणि त्यांच्या विशेषता एकदा वाचाच !