Cotton Market : कापूस उत्पादकांसाठी यंदाचा हंगाम विशेष असा फायदेशीर ठरलेला नाही. गेल्या हंगामात कापसाला 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल इतका विक्रमी दर मिळाला होता. साहजिकच याही हंगामात चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. सध्या मात्र कापसाला 7700 ते 8300 पर्यंतचा भाव देशांतर्गत बाजारात नमूद केला जात आहे.
शेतकऱ्यांना किमान नऊ हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळेल असं वाटतं होत, पण तूर्तास कापसाला कमी दर मिळत आहे. तज्ञ लोकांच्या मते सरकीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे कापूस दरात घसरण झाली आहे. डिसेंबर ते जानेवारी या काळात सरकी तीन हजार सहाशे ते चार हजार दोनशे दरम्यान विक्री होत होती.
पण फेब्रुवारी मार्च मध्ये 2800 ते 3200 दरम्यान सरकीचे सौदे होत आहेत. रुईचे दर मात्र 61 हजार ते 63 हजार रुपये प्रत्येक अंडी दरम्यान कायम आहेत. म्हणजेच सरकीचे बाजार भाव कमी झाले असल्याने कापूस दर 7700 पर्यंत खाली आले आहेत.
दरम्यान आता तज्ञ लोकांनी कापसाचे आवक बाजारात स्थिर राहिली आणि सरकीचे बाजार भाव वाढले तर कापूस दरात पुन्हा एकदा वाढ होऊ शकते असा अंदाज बांधला आहे. एकंदरीत सरकीचे बाजार भाव एक ते दोन महिन्यात 700 ते 1000 रुपये पर्यंत घसरले असल्याने कापसाचे भाव दबावात आहेत.
अशातच कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशातील तसेच जगातील एकूण कापूस उत्पादन या हंगामात घटल आहे. यामुळे जर कापूस उत्पादकांनी कापूस विक्री करताना गर्दी केली नाही, कापसाची आवक स्थिर राहिली किंवा कमी झाली तर सरकीचे दर वाढणार आहेत आणि कापूस दरात पुन्हा एकदा उभारी येणार आहे.
हे पण वाचा :- अभिमानास्पद ! वंदे भारत एक्सप्रेसच्या विकासात महाराष्ट्राचा वाटा; आता ‘या’ जिल्ह्यात तयार होणार Vande Bharat Train
तज्ञ लोक सांगत आहेत की पशुपालन व्यवसायात सरकी आणि ढेपची मागणी कमी झाली आहे. यामुळे सरकीच्या दरात घसरण झाली असून याचा फटका कापसाच्या बाजार भावाला बसला आहे. यामुळे आता सरकीचे दर वाढले तर कापसाच्या दरात वाढ होईल असे चित्र तयार होत आहे.
कारण की रुईचे दर गेल्या चार महिन्यांपासून स्थिर आहेत मात्र सरकीचे दर घसरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर आता सरकीच्या दराला आधार मिळण्याची गरज आहे. सरकीच्या दराला आधार मिळाला तर निश्चितच कापूस दरात वाढ होईल असा अंदाज तज्ञ वर्तवत आहेत.