Maharashtra Budget 2023 : आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 सादर करत आहेत. या आपल्या शिंदे फडणवीस सरकारच्या काळातील पहिल्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक शेतकरी त्याच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये सर्वात मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरु करण्याची घोषणा.
या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. वास्तविक पाहता गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर एक नवीन कल्याणकारी योजना सुरू होईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात होता.
दरम्यान आज या मीडिया रिपोर्ट मधील धावा खरा ठरला असून महाराष्ट्रातील विधिमंडळात देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत आता राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. अर्थातच पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना आता वार्षिक 12,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे.
म्हणजेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये असे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळू शकणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा राज्यातील एक कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे. तसेच या योजनेसाठी 6900 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार तिजोरीवर पडणार असून राज्य शासन या निधीच वहन करणार आहे.
निश्चितच, फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केलेली ही घोषणा शेतकरी हिताची असून यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यासोबतच या अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीसाठी चालना देणे हेतू 1000 कोटी रुपयांची घोषणा झाली आहे, हा निधी तीन वर्षांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिल जाणार असून आगामी तीन वर्षात राज्यातील जवळपास 25 लाख हेक्टर क्षेत्र हे सेंद्रिय शेती खाली आणल जाणार आहे.
यासोबतच राज्य शासनाने 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. एवढेच नाहीतर डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्ती वाढवली जाणार आहे. यासोबतच आणखी एक मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली ती म्हणजे आता शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा मिळणार आहे. निश्चितच यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकरी हिताच्या वेगवेगळ्या घोषणा फडणवीस यांनी केल्या असून फडणवीस सरकारच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत होत आहे.