Cotton Farming : तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात कापूस लागवड केली आहे का ? अहो मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. कापसाबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रात कापसाची सर्वाधिक लागवड केली जाते. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापूस उत्पादित होत आहे.
गेल्या वर्षी कमी पाऊस असतानाही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाची विक्रमी पातळीवर लागवड करण्यात आली होती. यामुळे यावर्षी अगदी सुरुवातीपासूनच यंदा कापूस लागवडी खालील क्षेत्र वाढणार असा दावा केला जात आहे.
गेल्या वर्षी कापसाला कमी बाजार भाव मिळाला असल्याने अनेकांना कापूस पिकातून अपेक्षित कमाई झालेली नाही. मात्र शेतकऱ्यांपुढे कापूस ऐवजी दुसरा कोणता पर्याय सध्या तरी पाहायला मिळत नाही. यामुळे प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात कापसाचे लागवड विक्रमी पातळीवरच कायम राहणार असा अंदाज आहे.
दरम्यान, आज आपण कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण कापूस पिकात पहिली फवारणी कोणती करावी आणि ही पहिली फवारणी नेमकी का केली पाहिजे या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कापूस पिकासाठी पहिली फवारणी कधी घ्यावी
कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे कापूस पिकासाठी पहिली फवारणी लागवडीनंतर 25-30 दिवसांनी म्हणजेच एक महिन्यानंतर घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी कापूस पिकासाठी जास्त महाग फवारणी करणे टाळावे असेही आवाहन तज्ञांनी केले आहे.
खरे तर सुरुवातीच्या टप्प्यात पिकावर किडींचा किंवा रोगांचा फारसा प्रादुर्भाव पाहायला मिळत नाही. म्हणून स्वस्त औषधांची फवारणी केली तरी चांगलेच राहणार आहे, अन याने उत्पादन खर्चात बचत होते.
पहिली फवारणी का करावी?
कृषी तज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे कापूस पिकात सुरुवातीला मावा आणि तुडतुडे कीटकांचा काही प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळू शकतो. यामुळे या कीटकांच्या नियंत्रणासाठी आणि पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिली फवारणी योग्यवेळी करणे आवश्यक राहणार आहे. पहिली फवारणी ही लागवडीनंतर साधारणता एक महिन्यांनी करण्याचा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
पहिल्या फवारणीत कोणत्या औषधांचा समावेश असावा?
पहिल्या फवारणीत एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक याचा वापर करायचा आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची इच्छा असेल ते शेतकरी बांधव या पहिल्या फवारणीत विद्राव्य खताचा देखील वापर करू शकता. दरम्यान आता आपण शेतकरी बांधवांनी कोणत्या कीटकनाशकाची, कोणत्या बुरशीनाशकाची आणि कोणत्या टॉनिक ची निवड केली पाहिजे याविषयी माहिती पाहणार आहोत.
पहिल्या फवारणीत शेतकरी बांधव कीटकनाशक म्हणून बायर कंपनीचं कॉन्फिडर किंवा बायर कंपनीचे सुपर कॉन्फिडर ( 8 मिली प्रति पंप ) किंवा सिजेंटा कंपनीचे Actara (10 gm प्रति पंप) किंवा टाटा कंपनीचे Rogor (25 एमएल प्रति पंप) + बुरशीनाशक म्हणून Indofil M45 (40 gm प्रति पंप) किंवा UPI – Saff (40 gm प्रति पंप) + टॉनिक म्हणून पाटील बायोटेक कंपनीचे ऑक्सिजन (50 ml प्रति पंप) किंवा BiovitaX (40 ml प्रति पंप) या औषधांची पहिची फवारणी करू शकतात.
म्हणजे आम्ही सांगितलेल्या पर्यायांपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची, कोणत्याही एका बुरशीनाशकाची आणि कोणत्याही एका टॉनिकची निवड करून तुम्ही पहिली फवारणी करू शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पहिल्या फवारणीत 19 19 19 हे विद्राव्य खत 100 ग्राम प्रति पंप या प्रमाणात वापरू शकता. आम्ही सांगितलेले प्रमाण हे 15 लिटरच्या पंपासाठी आहेत याची नोंद घ्यावी.