Cotton Farming : राज्यात पुढील 48 तासात मान्सूनचे आगमन होणार आहे. तत्पूर्वी मात्र राज्यातील काही कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कापूस लागवडीला सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे अशा बागायतदार शेतकऱ्यांनी आता मान्सूनपूर्व कापूस लागवडीला सुरुवात केली आहे.
कापूस पंढरी म्हणून विख्यात असलेल्या खानदेश मधील नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात देखील पूर्व हंगामी कापूस लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे चित्र आहे. तसेच विदर्भात आणि मराठवाड्यात देखील ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे सोय उपलब्ध आहे त्यांनी बागायती पूर्व हंगामी कापूस लागवडीला सुरुवात केली आहे.
अशातच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कापूस पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी आणि उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून एक मोलाचा सल्ला देण्यात आला आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! राज्यातील मान्सून आगमनाबाबत भारतीय हवामान विभागाने दिली ‘ही’ मोठी गुड न्युज, पहा काय म्हणतंय IMD
या पद्धतीने कापूस लागवड करा
शेती क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात की, कापूस उत्पादकांनी पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी कापसाची लागवड टोकन यंत्राच्या माध्यमातून केली पाहिजे. टोकन यंत्राच्या माध्यमातून कापसाची लागवड केली तर कमी बियाणे लागते. कमी बियाण्यात कापसाची लागवड होते.
मजूर टंचाईमुळे कापूस लागवडीसाठी शेतमजूर मिळत नाहीत अशा परिस्थितीत या यंत्राच्या साह्याने कमी मजुरांमध्ये देखील कापूस लागवड पूर्ण करता येऊ शकते. असं सांगितलं जातं की, कापसाची लागवड टोकन यंत्राच्या माध्यमातून केली तर एकजन एका दिवसात पाच एकर कापूस लागवड करू शकतो.
हे पण वाचा :- सोयाबीनची ‘या’ पद्धतीने लागवड करा आणि हमखास 15 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवा !
अर्थातच यामुळे बियाण्यावरील खर्च वाचणार आहे आणि मजुरीवरील देखील खर्च वाचणार आहे. एकंदरीत यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होणार आहे. तसेच टोकन यंत्राने लागवड केली तर योग्य खोलीत आणि योग्य अंतरावर कापसाचे बियाणे लावले जाते. यामुळे कापसाच्या बियाण्याची उगवण क्षमता चांगली बनते.
अर्थातच या पद्धतीने लागवड केल्यास बियाणे चांगल्या पद्धतीने अंकुरण पावतात परिणामी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता तयार होते. विशेष बाब म्हणजे हरभरा आणि मका लागवडीसाठी जे टोकन यंत्र वापरले जाते त्याच टोकन यंत्राच्या मदतीने कापसाची लागवड शक्य आहे. हे टोकन यंत्र बाजारात उपलब्ध आहे.