Cotton Farming : येत्या काही दिवसात खरीप हंगामाच्या पिक पेरणीला सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरु केली आहेत.
दरम्यान मान्सून आगमनाबाबत भारतीय हवामान विभागाने आपला सुधारित अहवाल जारी केला असल्याने पूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.
केरळात तीन-चार जूनला मान्सूनच आगमन होणार असून यानंतर साधारणता एका आठवड्यात आपल्या महाराष्ट्रातही मान्सूनच्या पावसाला सुरवात होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
वास्तविक खरीप हंगामामध्ये आपल्या राज्यातील शेतकरी सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात.
राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण या दोन्ही नगदी पिकावर अवलंबून आहे. विशेषता मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागातील बहुतांशी शेतकरी कपाशी पिकाची लागवड करतात.
याव्यतिरिक्त खानदेशमधील जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात कपाशी लागवड केली जाते. आता आगामी काही दिवसात कपाशी लागवडीस सुरुवात होणार आहे.
यामुळे आज आपण एका सुधारित कापूस वाणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण तुळशी कंपनीच्या एका जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! यंदा कापूस लागवड करतांना ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर….
कबड्डी कापसाच्या वाणाचे वैशिष्ट्य खालीलप्रमाणे
कापसाचे बाजारात अनेक सुधारित वाण आहेत. यात तुळशी कंपनीच्या कबड्डी या वाणाचा देखील समावेश होतो. कबड्डी हे वाण उच्च उत्पादनासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय असून राज्यातील बहुतांशी शेतकरी या वाणाची शेती करतात.
या जातीच्या कापसाची लागवड केल्यानंतर साधारणता 165 दिवसात पीक पक्व होते. या वाणाच्या कापूस बोंडाचे वजन हे जवळपास सहा ते सात ग्रॅम असते.
आपल्या महाराष्ट्रात या वाणाची मोठ्या प्रमाणात लागवड होते, महाराष्ट्र व्यतिरिक्त या जातीची लागवड आंध्र प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि तेलंगाना या प्रमुख कापूस उत्पादक राज्यात देखील मोठ्या लागवड केली जाते.
या जातीची एक विशेषता आहे ती म्हणजे याची लागवड मध्यम, भारी किंवा हलक्या जमिनीत केली जाते.
या जातीपासून साधारणतः 15 ते 20 क्विंटल एकरी उत्पादन शेतकऱ्यांना मिळते. निश्चितच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या जातीची लागवड अधिक उत्पादन मिळवून देणारी सिद्ध होणार आहे.
हे पण वाचा :- यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या ‘या’ महाराष्ट्रासाठी शिफारसीत जातीची पेरणी करा, अधिकचे उत्पादन मिळवा