Mumbai Metro News : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मुंबई लोकलमध्ये देखील मोठी गर्दी होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे लोकलवर आणि रस्ते वाहतुकीवर मोठा ताण येत आहे. परिणामी आता शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एमएमआरडीए मैदानात उतरले आहे. एम एम आर डी ए च्या माध्यमातून विविध विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. MMRDA च्या माध्यमातून राजधानी मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे मोठे जाळे विकसित होऊ लागले आहे. शहरात सद्यस्थितीला काही मार्गांवर मेट्रो सुरू आहे. तर काही मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. खरंतर, जेव्हा पण राजधानी मुंबईचा विषय निघतो…
Author: Office Krushi Marathi
Cow Farming : आपल्या देशात शेती आणि पशुपालन हे व्यवसाय फार पूर्वीपासून केले जात आहेत. पशुपालन व्यवसायात गाईंचे आणि म्हशीचे संगोपन मोठ्या प्रमाणात होते. शेतीशी निगडित व्यवसाय असल्याने या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. पशुपालन विशेषता म्हैस पालन आणि गाय पालन दुग्धोत्पादनासाठी केले जाते. दुधासोबतच या व्यवसायातून शेणखत देखील मिळते. यामुळे शेतकऱ्यांना शेण खतासाठी अधिकचा पैसा खर्च करावा लागत नाही. शिवाय शेणापासून गोबर गॅस तयार करता येतो. यामुळे गाय पालन हा व्यवसाय दुहेरी आणि तिहेरी उद्देशासाठी केला जात आहे. मात्र असे असले तरी गाय पालन व्यवसायातून जर चांगले दुग्धउत्पादन मिळवायचे असेल तर गाईच्या चांगल्या जातींचे संगोपन करणे आवश्यक आहे. यामुळे…
Cotton Farming Maharashtra : कापसाला व्हाईट गोल्ड अर्थातच पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं. मात्र या व्हाईट गोल्डने शेतकऱ्यांना चांगलेच वाईट अनुभव दिले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना कापसाचे पीक परवडत नसल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. एकतर कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येत आहे आणि दुसरे बाजारात मालाला अपेक्षित असा भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत असून अनेकदा शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाही. कापूस लागवडीचा विचार केला असता महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर येते. मात्र जेव्हा उत्पादनाचा विषय निघतो तेव्हा गुजरात राज्याचा पहिला नंबर लागतो. म्हणजेच आपल्या राज्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते मात्र पिकाची…
Wheat Farming : रब्बी हंगामात गहू या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. महाराष्ट्रात देखील गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. पंजाब आणि हरियाणा या राज्यात मात्र गव्हाचे क्षेत्र सर्वाधिक पाहायला मिळते. आपल्या राज्याचा विचार केला असता राज्यातील जवळपास सर्वचं जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात गव्हाची पेरणी होती. मात्र यंदा कमी पाण्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये गव्हाची पेरणी झालेली नाही. परंतु ज्या ठिकाणी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला होता आणि ज्यांच्याकडे शाश्वत पाणी उपलब्ध आहे अशा भागात गव्हाची पेरणी पाहायला मिळत आहे. यंदा कमी पावसामुळे गहू लागवडीखालील क्षेत्र बरेच कमी आहे. ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे त्या शेतकऱ्यांनी देखील कमी पावसामुळे…
Mumbai Railway News : मुंबई लोकलला मुंबईची लाईफ लाईन अर्थातच जीवितवाहिनी म्हणून संबोधले जाते. याचे कारण देखील तसे खासच आहे. मुंबईमधील जवळपास निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही प्रवासासाठी लोकलवर अवलंबून आहे. कदाचित हे प्रमाण यापेक्षा अधिकही असू शकतो. हेच कारण आहे की मुंबई लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. मात्र लोकलने प्रवास करणे खूपच आव्हानात्मक आहे. लोकल गाड्यांमध्ये होणारी गर्दी, शिवाय लोकल वेळेवर न येणे, लोकलचा वेग कमी असणे यांसारख्या अनेक कारणांमुळे लोकलचा प्रवास हा वेळ खाऊ बनला आहे. अनेक मार्गांवरील लोकलचा प्रवास हा प्रवाशांसाठी त्रासदायक ठरू लागला आहे. एकतर तुडुंब भरलेल्या लोकलमधून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.…
Maharashtra Rain : मान्सून काळात महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवली होती. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात राज्यात फक्त 88 टक्के एवढा पाऊस झाला. म्हणजेच सरासरीपेक्षा 12 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली. मात्र मान्सूनोत्तर अवकाळी पावसाने महाराष्ट्राला चांगलेचं झोडपले आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला आणि काही भागात गारपीट झाली. यामुळे अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले. शेती पिकांवर याचा मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळाला. म्हणून अवकाळी पावसाला शेतकरी बांधव कंटाळलेत. गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्रामुख्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे गेल्या महिन्याच्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने सर्वात जास्त नुकसान…
Central Railway News : मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची आणि नववर्ष सुरू होण्यापूर्वीच एक मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी राजधानी मुंबई, कल्याण नाशिक, जळगाव शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक आनंदाची राहणार आहे. कारण की मध्य रेल्वे मार्गावर एक नवीन साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गावर असलेल्या मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते उत्तर प्रदेश येथील मऊ रेल्वे स्थानकादरम्यान साप्ताहिक ट्रेन चालवली जाणार आहे. मध्य रेल्वेने नुकताच याबाबतचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही गाडी नासिक,…
Pik Vima Yojana : गेल्या काही वर्षांपासून राज्यासह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. कधी अवकाळी पाऊस, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट तर कधी दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्यांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. यावर्षी देखील राज्यातील काही भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली आहे तर काही ठिकाणी मान्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक वाया गेले आहे. दरम्यान शेतकऱ्यांना अशाच नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून पीक विमा योजना राबवली जात आहे. पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढता येतो.…
Vande Bharat Express : भारतात वंदे भारत एक्सप्रेस ही हाय स्पीड ट्रेन सुरू होऊन जवळपास पाच वर्षांचा काळ उलटला आहे. 2019 मध्ये ही गाडी सर्वप्रथम रुळावर धावली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील जवळपास 34 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे या गाडीला प्रवाशांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे. ज्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे तेथील प्रवाशांचा प्रवास या गाडीमुळे गतिमान आणि सुरक्षित झाला आहे. या गाडीची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. हेच कारण आहे की, देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला चालवले जाणार आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 2047 पर्यंत देशातील चार हजाराहून अधिक महत्त्वाच्या मार्गांवर…
Pune Railway News : गेल्या महिन्यात विजयादशमीचा आणि या चालू महिन्यात दिवाळीचा सण संपन्न झाल्यानंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे ते नवीन वर्षाकडे. सर्वांनाच आता नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. दरम्यान, सालाबादप्रमाणे याहीवर्षी या चालू वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाला वेलकम करण्यासाठी महाराष्ट्रातील बहुतांशी नागरिक गोव्याला जाणार आहेत. यामध्ये पुणे आणि मुंबई मधून मोठ्या प्रमाणात नागरिक गोव्याला जातील असा अंदाज आहे. दरम्यान या नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या स्वागतासाठी आणि ख्रिसमस सणाला गोव्याला जाणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वे विभागाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी…