शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! गहू पिकासाठी घातक ठरणाऱ्या तांबेरा रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्या औषधांची फवारणी करणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : रब्बी हंगामात गहू या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. महाराष्ट्रात देखील गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. पंजाब आणि हरियाणा या राज्यात मात्र गव्हाचे क्षेत्र सर्वाधिक पाहायला मिळते. आपल्या राज्याचा विचार केला असता राज्यातील जवळपास सर्वचं जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात गव्हाची पेरणी होती.

मात्र यंदा कमी पाण्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये गव्हाची पेरणी झालेली नाही. परंतु ज्या ठिकाणी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला होता आणि ज्यांच्याकडे शाश्वत पाणी उपलब्ध आहे अशा भागात गव्हाची पेरणी पाहायला मिळत आहे. यंदा कमी पावसामुळे गहू लागवडीखालील क्षेत्र बरेच कमी आहे.

ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे त्या शेतकऱ्यांनी देखील कमी पावसामुळे यंदा गव्हाच्या पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे यंदा गहू पिकाची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. खरे तर दरवर्षी गव्हाच्या पिकावर तांबेरा रोग पाहायला मिळतो.

तज्ञ लोक सांगतात की जर गव्हाच्या जास्त जुन्या जातीची पेरणी केली तर पिकावर हा रोग जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. तपकिरी आणि काळा तांबेरा या रोगामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत तांबेरा रोगाचा पिकावर प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गव्हाच्या सुधारित जाती करण्याचा सल्ला दिला जातो. गव्हाच्या जुन्या वाणांची लागवड करू नये असे मत जाणकार लोकांनी व्यक्त केले आहे.

या रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिरोधक वाण आणि बीजप्रक्रिया महत्त्वाची आहे. तरीही हा रोग पेरणीनंतर पिकामध्ये दिसल्यास, म्हणजे तपकिरी किंवा काळ्या तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास काही रासायनिक औषधांची फवारणी करण्याचा सल्ला तज्ञ लोकांनी दिला आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, पिकामध्ये ०.१ टक्के प्रोपिकोनाझोल (टिल्ट) २५ ईसी किंवा टेब्युकोनाझोल २५० ईसीची २-३ फवारणी फायदेशीर ठरु शकते.

या रोगाने ग्रसित झालेल्या लोंब्या दिसताच त्या पॉलिथिनने झाकून टाका, काळजीपूर्वक शेताबाहेर नेऊन जाळून टाका किंवा खोल खड्ड्यात गाडून टाका आणि वर नमूद केलेल्या बुरशीनाशकांचा वापर करा, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. तथापि कोणत्याही औषधाची फवारणी करणे अगोदर कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा